पक्षविरोधी काम केलेल्यांची नावे लेखी कळवा : छगन भुजबळ

राज्यातील राजकीय, सामजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शस्त्र टाकण्यासारखी परिस्थिती नाही तर त्याउलट अधिक जोमाने कामाला लागून संघटना पातळीवर पक्षाला बळकट करा. पक्षविरोधी काम करणाऱ्या व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सहभागी करून घेण्याच्या सुचना छगन भुजबळ यांनीकेल्याने कार्यकारणीत बदलाचे संकेत मिळत आहेत.
पक्षविरोधी काम केलेल्यांची नावे लेखी कळवा : छगन भुजबळ

नाशिक : ''लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जावू नका, देशाची व राज्याची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात प्रत्येकाच्या मनात सरकार विरोधात राग असून तो येत्या निवडणुकीतून व्यक्त होईल. त्यामुळे विधानसभेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा,'' असे आवाहन करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करीत ताकद दिली. 

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. ''लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या प्रतिक्रीयांतून ईव्हीएम वर देशभरातून आक्षेप घेतले जात आहेत. देशातील जवळपास तीनशे मतदारसंघात झालेले मतदान व प्रत्यक्ष मोजलेल्या मतदानात तफावत आढळली. हा सर्व प्रकार संशय निर्माण करणारा आहे. बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात यासाठी देशातील अनेक राजकीय पक्षांची मागणी आहे. सध्या देशातील न्याय व्यवस्थेत सुद्धा हस्तक्षेप केला जात आहे. माध्यमांची गळचेपी केली जात आहे,'' असे निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांची लेखी देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

राज्यातील राजकीय, सामजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शस्त्र टाकण्यासारखी परिस्थिती नाही तर त्याउलट अधिक जोमाने कामाला लागून संघटना पातळीवर पक्षाला बळकट करा. पक्षविरोधी काम करणाऱ्या व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत सहभागी करून घेण्याच्या सुचना त्यांनी केल्याने कार्यकारणीत बदलाचे संकेत मिळत आहेत.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख रविंद्र पगार होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार जयवंत जाधव, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, साहेबराव पाटील, प्रदेश पदाधिकारी विश्वास ठाकूर, अर्जुन टिळे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, महापालिका गटनेते गजानन शेलार, जिल्हा परिषदेचे सभापती यतिन पगार, अपर्णा खोसकर, गणपत पाटील, नितीन पवार,राजेंद्र जाधव, बाळासाहेब कर्डक, महेश भामरे, संदीप गुळवे, विष्णुपंत म्हैसधूने, निवृत्ती अरिंगळे, हिरामण खोसकर, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, सुषमा पगारे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com