" आम आदमी के साथ मनकी बात... मात्र अंबानीके साथ धनकी बात ' : छगन भुजबळ यांचा मोदींवर घणाघात

देशातील आम आदमी के साथ मनकी बात... मात्र अंबानीके साथ धनकी बात... अशी विचारधारेचे आचरण करणाऱ्या मोदी सरकारने मला का पकडले हे माझ्याबरोबर त्यांनाही समजले नाही. पंडीत नेहरु यांना व्हिजन होते त्यामुळे 1963 मधे भारताने रॉकेट लॉंच केले हे माहित असूनही मध्यंतरी उपग्रह संहार अस्त्राबाबत मी हे केले, असे केले तसे केले असे मोदी सांगतात ! आणि असेच असेल तर कुलभूषण जाधव यांना सोडवून आणून दाखवा असे आव्हानही भुजबळ यांनी दिले.
 " आम आदमी के साथ मनकी बात... मात्र अंबानीके साथ धनकी बात ' : छगन भुजबळ यांचा मोदींवर घणाघात

फलटण : देशात कॉंग्रेसने गेल्या 50 वर्षांत काहीही केले नाही, अशी हाकाटी मोदी देत आहेत. मुळात वीज, शिक्षण, दूरध्वनी, आधुनिक शेती, रस्ते या सुविधा गेल्या 50 वर्षांत आल्या आहेत. हे मोदी विसरत असून देशातील आम आदमी के साथ मनकी बात... मात्र अंबानीके साथ धनकी बात... अशा विचारधारेचे आचरण करणाऱ्या मोदी सरकारने मला का पकडले हे माझ्याबरोबर त्यांनाही समजले नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. 

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीसह मित्र पक्षाचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ फलटण शहरात झालेल्या सभेत श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर, नगर सेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सभापती प्रतिभा धुमाळ, नगराध्यक्षा नीता नेवसे, आमदार दीपक चव्हाण, दादाराजे खर्डेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. 

साडेचार वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत राज्यासह देशात अच्छे दिन येणार असा नारा देत चौकीदारीपर्यंत पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फसव्या घोषणांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवित माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आम्ही देशाचे मालक आहोत असे जाहिरपणे सांगून मोदी यांनी आपल्या कार्यपद्धतीने देशाचा दर्जा खाली आणला आहे. त्यांना जरा जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, असे खडे बोल सुनावले. 

मोदींनी पहिल्या दिवशी पार्लमेंटच्या पायरीवर डोके ठेवले तेंव्हाच असे वाटले की ते लोकशाहीची एैशी तैशी करणार आणि त्याच पध्दतीने पुढे वाटचाल होत असल्याचे दिसून आले आहे. मनुवादी विचारधारेतून ते देशाचा कारभार पहात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीची होळी केली व त्यातून सामान्यांना मताचा अधिकार दिला ही बाब सामान्यांचे हित जपणारी आहे. सद्यस्थितीत देशात चाललेल्या गदारोळात कॉंग्रेसने काहीही केले नाही, अशी हाकाटी मोदी करीत असले तरी वीज, शिक्षण, दूरध्वनी, आधुनिक शेती, रस्ते या सुविधा गेल्या 50 वर्षांत आल्या आहेत असे ते म्हणाले. 

देशातील आम आदमी के साथ मनकी बात... मात्र अंबानीके साथ धनकी बात... अशी विचारधारेचे आचरण करणाऱ्या मोदी सरकारने मला का पकडले हे माझ्याबरोबर त्यांनाही समजले नाही. पंडीत नेहरु यांना व्हिजन होते त्यामुळे 1963 मधे भारताने रॉकेट लॉंच केले हे माहित असूनही मध्यंतरी उपग्रह संहार अस्त्राबाबत मी हे केले, असे केले तसे केले असे मोदी सांगतात ! आणि असेच असेल तर कुलभूषण जाधव यांना सोडवून आणून दाखवा असे आव्हानही भुजबळ यांनी दिले. 

ओबीसी युवकांनी गोट्या खेळायच्या का.... 
मध्यंतरी लोकसेवा आयोगाचे प्रशिक्षण झालेल्या 320 युवकांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोकऱ्या नाकारल्याचा उल्लेख करून छगन भुजबळ म्हणाले, ठराविक गटातील युवकांना नोकऱ्या देता. मग ओबीसी युवकांनी काय गोट्या खेळायच्या काय, असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांच्या सत्तेविरुद्ध बोलले की राष्ट्रद्रोही ठरविणाऱ्या शासनाला येत्या निवडणुकीत देशातून फेकून दिल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com