मोदी राज म्हणजेच जुलमी राज! : छगन भुजबळ 

 मोदी राज म्हणजेच जुलमी राज! : छगन भुजबळ 

उल्हासनगर : मला कोणत्या कारणासाठी दोन वर्षे तुरुंगात डांबून ठेवले हे जसे मला माहीत नाही, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी अटक केली त्यांनाही माहीत नाही. अशा प्रकारचे जुलूम फक्त "मोदी राज'मध्येच होऊ शकतात, असा घाणाघात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निर्धार यात्रेच्या जाहीर सभेत केला.

उल्हासनगर- 3 येथील उत्सव लॉन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निर्धार यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली.

ते म्हणाले, की दिल्लीमधील महाराष्ट्र सदन इमारत भव्यदिव्य व्हावी म्हणून मी सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने त्या कामाला मान्यता दिली. हे काम अवघ्या 100-150 कोटींचे. त्यासाठी ठेकेदाराला अद्याप एक रुपया देण्यात आला नाही; मात्र शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या व्यवहारात झाला असे म्हणतात. हे शक्‍य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.केवळ राजकीय कटकारस्थान करून मला अटक केली होती.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, चित्रपट आणि मालिका सुरू होण्यापूर्वी एक सूचना देण्यात येते, की हा चित्रपट किंवा मालिका पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तविक घटनेशी काही संबंध नाही; असल्यास योगायोग समजावा. याच प्रकारे नरेंद्र मोदी कोणतेही आश्‍वासन अथवा भाषण देत असल्यास त्याअगोदर अशीच सूचना द्यायला हवी.


अंबानींसोबत धन की बात
जे महाराष्ट्र सदन ऐतिहासिक बनले, त्या सदनात अमित शहा जर दिल्लीत आले तर राहण्यास जातात. मोदी सरकार बेरोजगारांना रोजगार देण्यात फेल, नोटबंदीमध्ये फेल, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख देण्यात फेल, उद्योगधंदे-व्यापार आणण्यात फेल आणि आता राफेलमध्ये अपयशी ठरल्याची टीका त्यांनी सरकारवर केली. गरिबांसोबत मन की बात; तर अंबानींसोबत धन की बात असा टोलाही मारला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com