bhtan is natural country narendra modi | Sarkarnama

भूतान हा नैसर्गिक मित्र : मोदी 

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

थिम्फू : भारत आणि भूतानदरम्यान जसे सामंजस्य आहे आणि जशी देवाणघेवाण आहे, तसे जगातील कोणत्याही दोन देशांदरम्यान नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. हे दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र असल्याचेही ते म्हणाले. 

थिम्फू : भारत आणि भूतानदरम्यान जसे सामंजस्य आहे आणि जशी देवाणघेवाण आहे, तसे जगातील कोणत्याही दोन देशांदरम्यान नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले. हे दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र असल्याचेही ते म्हणाले. 

भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी आज येथील रॉयल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "भारत आणि भूतान हे केवळ भौगोलिकदृष्ट्या जवळचे नाहीत, तर येथील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेने दोन्ही देशांमध्ये विश्‍वासाचे संबंध निर्माण झाले आहेत. भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश भूतानमध्येही सर्वत्र पसरला.

या सर्व गोष्टींमुळे दोन्ही देशांमधील संबंधांत जसे नैसर्गिक सामंजस्य आहे, तसे इतर कोणत्याही दोन देशांमध्ये नसेल,' असे मोदी म्हणाले.

भूतानचे भविष्य असलेल्या तुमच्याशी बोलताना आनंद होत असल्याचे मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले. "तुमच्यामध्ये अशक्‍यप्राय गोष्टी करून दाखविण्याची ताकद आणि क्षमता आहे. तुमच्या देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कष्ट करा,' असे मोदी म्हणाले. 

विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भूतानमधील विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात नेपाळचे राजे जिग्मे वांगचुक यांनी मोदींसाठी खास भोजन समारंभाचे आयोजन केले होते. यानंतर मोदी भारतात परतले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख