भोसरी शिवसेना बैठक : आढळराव समर्थक महिलेने धरली गचांडी; पुरुषाने लगावली थोबाडीत

पिंपरी-चिंचवड शिवसेनेतील मतभेद बुधवारी मुद्यावरून गुद्यांवर आले. माजी पुरुष पदाधिकाऱ्याने भर बैठकीत एका महिला पदाधिकाऱ्याच्या थोबाडीत मारल्या.त्यानंतर महिला पदाधिकाऱ्याच्या समर्थकांनी या पुरुष पदाधिकाऱ्याला मारहाण केली. भोसरी विधानसभा शिवसेनेच्या बैठकीत हा स्फोट झाला. पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच ही माहिती दिली.
भोसरी शिवसेना बैठक : आढळराव समर्थक महिलेने धरली गचांडी; पुरुषाने लगावली थोबाडीत

पिंपरीः पिंपरी-चिंचवड शिवसेनेतील मतभेद बुधवारी मुद्यावरून गुद्यांवर आले. माजी पुरुष पदाधिकाऱ्याने भर बैठकीत एका महिला पदाधिकाऱ्याच्या थोबाडीत मारल्या.त्यानंतर महिला पदाधिकाऱ्याच्या समर्थकांनी या पुरुष पदाधिकाऱ्याला मारहाण केली. भोसरी विधानसभा शिवसेनेच्या बैठकीत हा स्फोट झाला. पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच ही माहिती दिली. दरम्यान, हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले आहे.

शहरातील पिंपरी या राखीव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध दिसून आला आहे.त्यातून विद्यमान नगरसेवकासह एका युवासेना पदाधिकाऱ्याने बंडाचा आज झेंडा फडकावला. तो कमी म्हणून की काय लगेचच भोसरी या दुसऱ्या मतदारसंघात पक्षातील मतभेद,तर गुद्यावरच गेले. त्यामुळे शहर शिवसेनेतील गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आली आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेने क्लेम केलेला भोसरी मतदारसंघ न मिळाल्यातून हा प्रकार घडला. युतीत ही जागा भाजपकडे गेली असून तेथे त्यांनी आपला उमेदवारही जाहीर केला आहे. एवढेच नाही,तर त्यांचा प्रचारही धडाक्यात सुरु झाला आहे.त्यामुळे आता पुढे काय करायचे यासाठी भोसरीतील एका पक्ष इच्छूकाच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. त्यात भोसरीतील  भाजप नगरसेवकांचे सासरे असलेल्या शिवसेनेच्या या माजी पदाधिकाऱ्याने पक्षाचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विरोधात टीकाटिपण्णी केली. ती आढळरावांचे कट्टर समर्थक महिला पदाधिकाऱ्यांना खटकली.  त्यावरून या दोघांत वादावादी झाली. महिला पदाधिकाऱ्याने आढळरावांवर टीका करणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांचे गचांडी धरली. त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्याने महिला पदाधिकाऱ्याच्या दोन थोबाडीत मारल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com