भोसरीचे आमदार महेश लांडगेंचे गुजराती भाषेत फ्लेक्स

मेट्रोसह इतर कामांसाठी केलेला पाठपुरावा व मार्गी लागलेल्या काही कामांबद्दल पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात गुजराती भाषेत फ्लेक्स लावल्याने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मनसेने या बॅनरबाजीचा निषेध केला असून उद्या ते त्याविरोधात आंदोलन करणार आहेत.
Bhossar MLA Mahesh Landge Gujrati Flex
Bhossar MLA Mahesh Landge Gujrati Flex

पिंपरी : मेट्रोसह इतर कामांसाठी केलेला पाठपुरावा व मार्गी लागलेल्या काही कामांबद्दल पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी आपल्या मतदारसंघात गुजराती भाषेत फ्लेक्स लावल्याने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मनसेने या बॅनरबाजीचा निषेध केला असून उद्या ते त्याविरोधात आंदोलन करणार आहेत.

पुणे (स्वारगेट),-पिंपरी मेट्रोच्या विस्तारास निगडी व चाकणपर्यंत मंजुरी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिला, संतपीठ व सफारी पार्क उभारणीला मान्यता घेतली.स्वतंत्र पोलिस आय़ुक्तालय शहरासाठी सुरु केले आदी कामांचे महेशदादांच्या फोटोचे २३ भाषेतील फ्लेक्स आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरात झळकले आहेत. महेशदादा भाजपकडून भोसरीची निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास नक्की झाल्याने त्यांनी मतदारसंघात ही जाहिरातबाजी केली आहे. 

एक देश, भाषा अनेक, विभिन्न विचार, परी देशाभिमान एक असे घोषवाक्यही या फ्लेक्सवर टाकण्यात आले आहे. मराठीचा आहेच अभिमान, भारतीय भाषांचा करतोय सन्मान,असे स्पष्टीकरण व खुलासाही त्यावर केला गेला आहे. एमआयडीसी असलेल्या भोसरीत २३ टक्के बिगरमराठी (इतर भाषिक)म्हणजे परप्रांतीय मतदार आहेत. त्यांच्यासाठी ही जाहिरातबाजी करण्यात आल्याचे समजते.

एकूणच पिंपरी-चिंचवडचा तोंडावळा हा निमशहरी आहे.महापालिका व पोलिस आयुक्तालय असले,तरी शहराचे गावपण अजून टिकून आहे.म्हणून येथे गावकी,भावकीचे राजकारण चालते. शहराचा काही भाग अद्याप ग्रामीण आहे.भोसरीचाही बहुतांश मतदार गावातला आहे. त्यामुळे गुजरातीसह इतर न समजणाऱ्या भाषांत लागलेले हे बॅनर लगेच चर्चेचा विषय झाले. त्यावरील मजकूर अनेकांना समजला नसला,तरी लांडगे यांचा फोटो ते ओळखत होते.

दरम्यान,आमदार पुण्यातला मात्र, बॅनर गुजरातीत असल्याबद्दल मनसेने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्या पुण्यात मराठीचा ज्ञानकोष तयार झाला. मराठी भाषा ही भाषा अलंकारांनी नटली,तेथेच भाजपचा सहयोगी सदस्य मराठीला नग्न करून गुजरातील नटवत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली. तसेच त्याविरोधात उद्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com