शिवेंद्रराजेंना समर्थकांकडून भाजपमध्ये जाण्यासाठी कौल...

शिवेंद्रराजेंना समर्थकांकडून भाजपमध्ये जाण्यासाठी कौल...

सातारा : बाबाराजे, वेळ घालवू नका..मतदारसंघाच्या हितासाठी तुम्ही भाजपमध्ये जावा. तुम्ही जो घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी ग्वाही सातारा शहर व उपनगरातील समर्थकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिली. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशाला सातारा शहरातील समर्थकांनी हिरवा कंदील दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सातारा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यास भाजपचे नेते यशस्वी ठरले आहेत. यावर आज शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या सातारा शहरातील समर्थकांचे मत आजमवून घेण्यासाठी सुरूची बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर, प्रकाश गवळी, नासीर शेख, अशोक मोने, ऍड. डी. आय. एस. मुल्ला, रामभाऊ साठे, हेमंत कासार, यासह पालिकेतील नगरविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

सुरवातीला सर्वांनी आपले म्हणणे मांडले. यामध्ये मतदारसंघाच्या हितासाठी आपण जे निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे वेळ घालवू नका, मतदारसंघाच्या हितासाठी भाजपमध्ये जावे. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका मांडली. यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा-जावली मतदारसंघातील समाज, मतदारसंघ आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय मी घेणार आहे. कुठेही असलो तरी मला संघर्ष अटळ आहे. लढाई ही करावीच लागणार आहे. लढाईच करायची असेल कोठे थांबायचे याबाबत समर्थकांचे म्हणणे विचारात घेऊन मी निर्णय घेईन. यावर सर्वांनी महाराज तुम्ही भाजपसोबत चला आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com