bhosale and bjp government | Sarkarnama

भाजपमधील प्रवेशापासून उदयनराजे थांबले की त्यांना कुणी थांबवले ?

उमेश घोंगडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पुणे : सातारचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश वारंवार लांबणीवर पडतोय. या प्रवेशासंदर्भात आज पुण्यात होणारी बैठक रद्द करून उदयनराजे मुंबईला गेले. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेश लांबण्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्यास विरोध केल्याने उदयनराजेंनी थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपने आणखी दोन दिवस थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. 

उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. राजांनी भाजपमध्ये जाऊ नये, यासाठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र, त्याला फारसे यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी आज पुण्यात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. 

उदयनराजांची तब्बेत बरी नसल्याचे सांगण्यात आले तसेच ते मुंबईला रवाना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकीटावर पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यात काही कार्यकर्त्यांना " रिस्क ' वाटत असल्याने हे कार्यकर्ते राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे उदयनराजे संभ्रमात असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुतांश कार्यकर्त्यांना मात्र राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्यात कोणतीच अडचण वाटत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हा गट राजीनामा नेऊन भाजपमध्ये जाण्याचा आग्रह करीत आहेत. 

उदयनराजे, शिवेंद्रराजे व रामराजे नाईक-निंबाळकर एकाचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. या काळात रामराजे व उययनराजे तसेच शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्यात मतभेद होते. आता हे सर्वजण भाजपात आल्यानंतर तिथेही मतभेद होणार नाहीत, याची खात्री कोण देणार असा विचार करणारा एक गट भाजपमध्येही आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या प्रवेशाचे काय होणार याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख