थोपटेंसाठी आक्रमक झालेल्या नगरसेवकांना बाळासाहेबांनी दिले आणखी एक आश्वासन

...
balasaheb thorat about sangram thopate
balasaheb thorat about sangram thopate

भोर : मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भोर नगरपालिकेतील नाराज झालेल्या नगराध्यक्षांसह  सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन नगरसेवकांनी राजीनामे दिले. नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार व गटनेते सचिन हर्णसकर  आदींसह वीस नगरसेवकांनी आपले राजीनामे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केले.

मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी आमदार संग्राम थोपटे यांना डावलल्याने नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे बोर्ड जाळून आपला निषेध नोंदविला होता. त्यावेळी त्यांनी  सामूहिक राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. भोर नगरपालिकेत संपूर्ण सत्ताही काँग्रेसची असून १७ नगरसेवक एक नगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक असे एकूण वीस जणांनी  राजीनामे दिले आहेत.

भोर तालुक्यातील नाराज  असलेल्या काँग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी राजीनामे पाठविले असून सर्व समित्या बरखास्त केलेल्या आहेत. याशिवाय काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात जाऊन आपला निषेध नोंदविला होता. आतातर नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. याबाबत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

विस्तारात अखेरच्या क्षणी कोणते  महानाट्य घडले आणि आमदार संग्राम थोपटे यांचे नाव का वगळण्यात आले, याबाबत बाळासाहेब थोरात यांना  विचारणा करण्यात आली.  त्यावर  थोरात म्हणाले की तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मंत्रिपदासाठी खूप स्पर्धा होती. त्यामुळे आम्ही काही जणांना न्याय देऊ शकलो नाही. भोर तालुक्यातील काँग्रेसप्रेमींची नाराजी दूर करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या यांच्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेऊ. यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यासमवेत थोपटे यांची बैठकही घेण्यात येईल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com