भोरमधील कॉंग्रेसचे नगरसेवक राजीनामे देणार ?

भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांना निश्‍चितपणे मंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात येत होते. कार्यकर्त्यांनाही तशी खात्री वाटत होती. मात्र, सत्तास्पर्धेच्या राजकारणात थोपटे यांचे नाव ऐनवेळी मागे पडले. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील कॉंग्रेस भवनावर हल्ला करत तोडफोड केली. या तोडफोडीचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले.
भोरमधील कॉंग्रेसचे नगरसेवक राजीनामे देणार ?

पुणे : कॉंग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यासाठी भोर नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसचे 20 नगरसेवक बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत. संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचा निषेध करीत केवळ नाराजी व्यक्त न करता सर्व नगरसेवक राजीनामा देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांना निश्‍चितपणे मंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात येत होते. कार्यकर्त्यांनाही तशी खात्री वाटत होती. मात्र, सत्तास्पर्धेच्या राजकारणात थोपटे यांचे नाव ऐनवेळी मागे पडले. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील कॉंग्रेस भवनावर हल्ला करत तोडफोड केली. या तोडफोडीचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. 

तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांशी आपला संबंध नसल्याचा खुलासा या घटनेनंतर आमदार थोपटे यांनी केला. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर थोपटे यांची सत्ता असलेल्या भोर नगरपालिकेतील सर्व 20 नगरसेवक आज मुंबईला रवाना झाले. प्रदेशाध्यक्ष थोरात यांना भेटून राजीनामा देण्याच्या इराद्यानेच सर्वजण भोरमधून निघाले आहेत. कॉंग्रेसभवनावरील हल्ल्यानंतर हा विषय पक्षाच्यावतीने गांभीर्याने घेतला जाईल, असे वाटत होते. मात्र, पक्षाने या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी कोणतीही तीव्र प्रतिक्रिया व्क्त केली नाही. आमदार थोपटे यांच्यावर खरोखरच अन्याय झाल्याची भावना पक्षातही आहे. त्यामुळे थोपटेंबाबत पक्षातून मवाळ भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर भोर नगरपालिकेतील 20 नगरसेवक पुन्हा आक्रमक झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com