भोकरदनमध्ये संतोष दानवे यांचा सलग दुसरा विजय

santosh-danve.
santosh-danve.

भोकरदन : भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार संतोष दानवे हे 32 हजार 020 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा सलग दुसऱ्यांदा संतोष दानवे यांनी पराभव केला.


2014 च्या मोदी लाटेत अवघ्या 6750 मतांनी निवडून आलेल्या संतोष दानवे यांनी यंदा चारपट मताधिक्य घेतले. अपक्ष उमेदवार व वंचित आघाडीचे उमेदवार यांचा फारसा प्रभाव प्रचारात व मतदारांवर देखील दिसून आला नाही.
आमदार संतोष दानवे यांच्या प्रचारासाठी अख्खे दानवे कुटुंबीय मतदार संघात फिरत होते तर चंद्रकांत दानवे हे एकटे खिंड लढवत होते.

यंदा प्रचाराचा जोर हा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर होता यात संतोष दानवे यांनी आघाडी घेतली होती , तर राष्ट्रवादीकडून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी वर भर दिला होता.


काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी व नगरसेवकांनी  महिनाभरापूर्वीच भाजपात प्रवेश केल्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार का असे चित्र जरी वाटत असले तरीसुध्दा स्थानिक पातळीवर भाजपातील गट-तट,रावसाहेब दानवेंची घराणेशाही ,धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आदी मुद्यांवर प्रचार करीत चंद्रकांत दानवे यांनी भाजपच्या नाकी नऊ आणल्याचे चित्र होते.


भोकरदन शहरातील नगरपरिषद ही काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे शहरातील मतदानावर निवडणुकीचे काहीसे चित्र अवलंबून होते. रावसाहेब दानवे यांनी देखील यावेळी भोकरदन शहरावर फार लक्ष केंद्रित केले होते . मात्र यावेळी देखील शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसलाच 1000 मतांच्या वर मताधिक्‍य मिळाले.


भोकरदन मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षांनी यंदा इमानेइतबारे भाजपाचे काम केले तर महाआघाडीतील काँग्रेसने देखील आघाडी धर्म पाळला हे विशेष.
संतोष दानवे यांनी पहिल्या फेरीपासून  आघाडी कायम ठेवली होती.  चंद्रकांत दानवे यांना 85745 तर संतोष दानवे यांना 117765 मते मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com