पुर्वमध्ये भाजपचे अतुल सावे 14216 मतांनी विजयी

पुर्वमध्ये भाजपचे अतुल सावे 14216 मतांनी विजयी

औरंगाबाद : पुर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे अतुल सावे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवत जागा राखली आहे. एमआयएमचे गफ्फार कादरी यांचा त्यांनी 14216 मतांनी पराभव केला. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये कादरी यांनी सावे यांच्यावर पन्नास हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. पण नंतर सावे यांनी त्यावर मात करत शेवटच्या फेरीत चौदा हजार मतांनी कादरी यांचा पराभव केला.

औरंगाबाद पुर्व मतदारसंघातील लढत एमआयएमला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केल्यामुळे चुरसीची झाली होती. सर्वाधिक उमेदवार असणाऱ्या या मतदारसंघात एमआयएम बाजी मारणार असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु अतुल सावे यांनी गेल्या सोडचार वर्षात मतदारसंघात केलेली कामे आणि राज्यमंत्री झाल्यानंतर शहरासाठी मंजुर करून आणलेली पाणी योजना याचे श्रेय मतदारांनी मतांच्या रुपाने सावे यांना दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुर्व मतदारसंघात तब्बल 34 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु मुख्य लढत महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यातच होती. राज्यात एमआयएम वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्यानंतरही कादरी यांनी प्रकाश आंबेडकर यांना गळ घालून पुर्वमध्ये वंचितचा पाठिंबा मिळवला होता. त्यामुळे वंचितने इथे उमेदवार देखील दिला नव्हता.

दलित-मुस्लिम मतांचे विभाजन टाळ्ण्याचा पुरेपूर प्रयत्न कादरी यांनी केला. पण त्यावर शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे सावे यांना सहज मात करता आली. सुरुवातीच्या 10-12 फेऱ्यांपर्यंत कादरी यांनी सावे यांच्यावर आघाडी घेतल्याने युतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. पण त्यानंतर सावे यांनी कादरी यांची लीड तोडत आघाडी घेतली आणि विजय मिळवूनच थांबले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com