भिवंडीत शिवसेनेला धक्का; दोन शाखाप्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर करण्याची स्पर्धा सुरु झाली असून याचा सर्व जास्त धक्का शिवसेनेला बसत आहे.
भिवंडीत शिवसेनेला धक्का; दोन शाखाप्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

भिवंडी : ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी  मिळवण्यासाठी पक्षांतर करण्याची स्पर्धा सुरु झाली असून याचा सर्व जास्त धक्का शिवसेनेला बसत आहे. 

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मतभेद असल्याने भिवंडी तालुक्यातून अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत असतानाच आज शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांनी भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खासदार पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. 

शिवसेनेचे पिंपळघर येथील शाखाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य हिरानंद पाटील आणि सरवलीपाडा येथील शाखाप्रमुख श्रीराम चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार कपिल पाटील यांनी दोघांचेही स्वागत केले. 

खासदार कपिल पाटील यांच्याकडून भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळणासोबतच नागरी सुविधांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यांची विकासाची दृष्टी लक्षात घेऊन खासदार पाटील यांच्याबरोबर कार्य करण्यासाठी आम्ही शिवसेनेबाहेर पडलो आहोत, अशी प्रतिक्रिया दोघा शाखाप्रमुखांनी व्यक्त केली.

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,राम माळी,भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com