भिवंडीत शिवसेनेला धक्का; गिरीश कृष्णा म्हात्रे भाजपमध्ये दाखल

ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर होताच उमेदवारी मिळवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षातर करू लागले असून भिवंडीत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांचा पुतण्या व शिवसेनेचे युवा ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश कृष्णा म्हात्रे यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. त्यामुळे सेना गटात खळबळ माजली आहे.
भिवंडीत शिवसेनेला धक्का; गिरीश कृष्णा म्हात्रे भाजपमध्ये दाखल

भिवंडी  : ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर होताच उमेदवारी मिळवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षातर करू लागले असून भिवंडीत शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांचा पुतण्या व शिवसेनेचे युवा ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश कृष्णा म्हात्रे यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. त्यामुळे सेना गटात खळबळ माजली आहे. भाजपचे ठाणे विभागीय अध्यक्ष व खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत गिरीश म्हात्रे यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्याचे पुष्पगुच्छ देत खासदारांनी स्वागत केले.

`गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत व कुरघोडीच्या राजकारणाला आपण कंटाळलो होतो. दुसरीकडे भाजपचे खासदार पाटील यांची भिवंडी तालुक्यातील गावांच्या विकासाची भूमिका पसंतीला आली. त्यातून आपण भाजपकडे वळलो आहोत. भाजपच्या माध्यमातून गुंदवलीसह परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,' अशी प्रतिक्रिया गिरीश म्हात्रे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. आता जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुखांच्याच पुतण्याने भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. गिरीश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा परिषदेच्या पुर्णा गटात भाजपची स्थिती मजबूत झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com