Bhiwandi Congress Leader Santosh Shetty back to BJP
Bhiwandi Congress Leader Santosh Shetty back to BJP

भाजपमधून काँग्रेसमध्ये, आता पुन्हा भाजपमध्ये - भिवंडीच्या नगरसेवकाच्या राजकीय उड्या

विधानसभा निवडणुकीत भिवंडीत भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसचा 'हात' पकडणा-या संतोष शेट्टी यांनी कॉंग्रेस पक्षाला टाटा करीत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला असून काल सायंकाळी नवी मुंबई नेरूळ येथील भाजपा राज्य अधिवेशना दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतोष शेट्टी यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला

भिवंडी :  विधानसभा निवडणुकीत भिवंडीत भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसचा 'हात' पकडणा-या संतोष शेट्टी यांनी कॉंग्रेस पक्षाला टाटा करीत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला असून काल सायंकाळी नवी मुंबई नेरूळ येथील भाजपा राज्य अधिवेशना दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संतोष शेट्टी यांना पक्षात पुन्हा प्रवेश देऊन त्यांच्यावर लागलीच भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोपविली आहे .

त्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्तींनी रात्री शहरातील पद्मानगर परिसरात जोरात फटाक्‍यांची आतिषबाजी करीत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील एक महत्वाचे सत्ताकेंद्र म्हणून संतोष शेट्टी हे ओळखले जात असून गेल्या 20 वर्षांपासून ते नगरसेवक म्हणून पालिकेत कार्यरत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास सोडचिठ्ठी देत भाजपा कडून निवडणूक लढविली होती त्या निवडणुकीत तीन हजार मतांनी पराभव झाल्या नंतर भिवंडी शहरात भाजपा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना शहरात पक्ष संघटना वाढीस विशेष प्रयत्न केले.

परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपा सेना युती मुळे संतोष शेट्टी यांनी कॉंग्रेस पक्षाची साथ घेत निवडणूक लढले. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवी मुंबई येथील राज्य अधिवेशन कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना भाजपा पक्षप्रवेश देण्या करण्यासाठी आमंत्रित केले होते. या अधिवेशन कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते संतोष शेट्टी यांना भाजपात पक्ष प्रवेश दिला. 

तर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याच क्षणी भिवंडी शहरजिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांच्या संघटन कौशल्यास पसंती दिली आहे. प्रभारी शहराध्यक्ष अॅड हर्षल पाटील यांच्या सह आमदार महेश चौघुले, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, गटनेते हनुमान चौधरी, नगरसेवक निलेश चौधरी, युवा अध्यक्ष विशाल पाठारे यांच्या सह मान्यवर नगरसेवकांनी शेट्टी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com