bhiwandi bjp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भिवंडीत कॉंग्रेसला खिंडार, शेकडो पदाधिकारी भाजपमध्ये

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

भिवंडी : भिवंडी तालुक्‍यात कॉंग्रेस पक्षाला अचानकपणे जोरदार झटका बसला असून, कॉंग्रेसपक्षाचे खोणी गावातील स्थानिक मातब्बर पदाधिकारी भाजपा पक्षामध्ये दाखल झाले आहे. भाजपचे ठाणे विभागीय जिल्हाध्यक्ष तथा खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यामुळे अन्य गावात फाटाफूट होऊ नये यासाठी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. 

भिवंडी तालुक्‍यात खोणी गांव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत कॉंग्रेसकडून तब्बल दहा वर्षे सरपंचपद भूषविलेले नामदेव शास्त्री, रेवती नामदेव शास्त्री, माजी सदस्य जवाहर कमल मंडल, कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते निखील शास्त्री, सुरेश वाळकू पाटील, माजी उपसरपंच मेमन गुड्डूसाहेब शेख, ग्रामपंचायतीचे सदस्य उत्तम वसंत म्हात्रे, मेघा उत्तम म्हात्रे, सोहेल नवाब बेग आदी उपस्थित होते. 

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष जनार्दन बाळाराम पाटील यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार कपिल पाटील यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन भाजपमध्ये स्वागत केले. तसेच खोणीच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भाजपचे जिल्हा परिषदेतील सहयोगी सदस्य अशोक घरत, भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश कोंडलेकर यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजाविली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख