भिवंडीत कॉंग्रेसची १८ मते फुटली, महापौरपदी कोणार्क - भाजप आघाडीच्या प्रतिभा पाटील

भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आघाडीची सत्ता उलथवून चमत्कार केल्याने कोणार्क आघाडीला विजय मिळविता आला.
Bhivandi Raka Patil
Bhivandi Raka Patil

भिवंडी :  भिवंडी शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप - कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या. तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

भिवंडी पालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता हि निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी कॉग्रेस तर्फे रिषिका राका व भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात असल्याने पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले.

 या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय (एकतावादी), समाजवादी पक्ष व भाजप व फुटीरतावादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मते मिळवून  विजयी झाल्या. तर शिवसेना कॉंग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

विशेष म्हणजे महापालिकेत कॉंग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक भाजप कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने कॉंग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजप व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली.

त्यांनी सेनेचे जेष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला. चौधरी यांना 41 मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्थकारण घोडेबाजार झाल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली.

भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आघाडीची सत्ता उलथवून चमत्कार केल्याने कोणार्क आघाडीला विजय मिळविता आला. भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी कॉंग्रेसने 47 जागा मिळवून बहूमत संपादन केले. 

तर भाजपने 20 शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी व रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात कॉंग्रेसने सेनेला उपमहापौर पद दिले होते. 

परिणामी  भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीने कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे.


 कॉंग्रेसचे व्हीप नाट्य 
या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अंसारी यांनी सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरु असतांना कॉंग्रेसच्या नगरसेवकांना जबरदस्तीने पक्षाचे व्हीप वाटप सुरु केले त्यावर कॉंग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांनी आक्षेप घेत व्हीप वाटपाचे काम बंद पाडले.

 कॉंग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांनी सुरुवातीला कॉंग्रेस उमेदवार रिषिक राका यांच्या नावाने दोन दिवसांपूर्वी पक्षाचा व्हीप जाहीर केला असतांना आज प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशीच वर्तमानपत्रात कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा विलास पाटील यांना मतदान करा अशी जाहिरात खुद्द कॉंग्रेस गटनेत्यांनी दिल्याने तंटा निर्माण झाला होता.

विशेष म्हणजे दोन दोन व्हीप जाहीर केल्याने महापौर व उपमहापौर निवडणुकीत होणार आर्थिक घोडेबाजाराची चापलूसी देखील चाव्हटयावर आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com