भिवंडीतील योजनांसाठी भाजपचा पाठपुरावा; सत्ताधारी कॉंग्रेसचे दुर्लक्ष : आमदार महेश चौघुले

महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात नागरी विकास कार्याच्या माध्यमातून नागरिकांचा विश्‍वास संपादन केला असून, भिवंडीचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने विविध प्रलंबित विकासकामांसाठी निधी दिला आहे. याअंतर्गत एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो रेल्वेचा आराखडा तयार केला असून, ही नागरिकांसाठी गौरवाची बाब आहे, असे भिवंडी भाजप शहराध्यक्ष संतोष एम. शेट्टी आणि भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी सांगितले.
भिवंडीतील योजनांसाठी भाजपचा पाठपुरावा; सत्ताधारी कॉंग्रेसचे दुर्लक्ष : आमदार महेश चौघुले

भिवंडी : महाराष्ट्रात तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात नागरी विकास कार्याच्या माध्यमातून नागरिकांचा विश्‍वास संपादन केला असून, भिवंडीचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने विविध प्रलंबित विकासकामांसाठी निधी दिला आहे. याअंतर्गत एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो रेल्वेचा आराखडा तयार केला असून, ही नागरिकांसाठी गौरवाची बाब आहे, असे भिवंडी भाजप शहराध्यक्ष संतोष एम. शेट्टी आणि भाजपचे आमदार महेश चौघुले यांनी सांगितले. 

भाजप मध्यवर्ती कार्यालयात देवेंद्र फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या पूर्तीनिमित्त जल्लोष आभार आणि कार्यकर्ता मेळावा झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पालिकेचे विरोधी पक्षनेता श्‍याम अग्रवाल, यशवंत टावरे, सरचिटणीस हर्षल पाटील, प्रेषित जयवंत, महिला अध्यक्षा ममता परमाणी आदी या वेळी उपस्थित होते. 

भिवंडीवर देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रेम व्यक्त करत स्वच्छता, उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना, रस्ते, विकास कार्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून, त्यामुळेच शहरातील मुख्य अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका येथे सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनवला जात आहे. 

शहरांतर्गत 52 इतर रस्तेही सिमेंट कॉंक्रीटचे होणार आहेत. त्यापैकी 12 रस्त्यांच्या कामास पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार चौघुले यांनी दिली. 

लोकप्रतिनिधींकडून सरकार स्तरावरून विविध योजनांचा पाठपुरावा सुरू असताना भिवंडी महापालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेस आणि प्रशासन हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याने त्याचा नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप चौघुले यांनी केला. 

वर्षभरात नागरी सुविधांचा कायापालट 
मुख्यमंत्र्यांनी भिवंडीतील नागरिकांसाठी मेट्रोची भेट दिली असून, त्यामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कार्य या तीन वर्षात झाल्याने नागरिक समाधानी आहेत. 

पाठपुराव्यामुळे शहरातील न्यायालय इमारतीसाठी 38 कोटी आणि भिवंडी शहराजवळच्या ग्रामपंचायत परिसरातील रस्त्यांसाठी तब्बल 70 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत. वर्षभरात या भागातील नागरी सुविधांचा कायापालट होणार आहे. 

महापालिका प्रशासन काम करण्यात असमर्थ ठरत असल्याने आम्ही स्वतः एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आमदार महेश चौघुले यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com