भिवंडीत रस्ते दुरुस्तीसाठी  नागरिकांनी भीक मागून पैसे गोळा केले  - Bhivandi Citizens agitaion against corporation | Politics Marathi News - Sarkarnama

 भिवंडीत रस्ते दुरुस्तीसाठी  नागरिकांनी भीक मागून पैसे गोळा केले 

शरद भसाळे : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

भिवंडी  :  भिवंडी महापालिका रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी नसल्याने आज सकाळी भिवंडी संघर्ष समितीच्या वतीने नागरिकांनी भीक मागो मोर्चा काढून जमा केलेला निधी पालिका प्रशासनाकडे सुपूर्त करण्याचा प्रयत्न केला . 
मात्र पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाब यांनी हा निधी घेणार नसल्याचे सांगितले . 

त्यामुळे जमा केलेला निधीचे डबे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी डॉ संतोष थिटे यांच्या कडे सुपूर्द केले . तसेच प्रांत अधिकारी व पालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. 

भिवंडी  :  भिवंडी महापालिका रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी नसल्याने आज सकाळी भिवंडी संघर्ष समितीच्या वतीने नागरिकांनी भीक मागो मोर्चा काढून जमा केलेला निधी पालिका प्रशासनाकडे सुपूर्त करण्याचा प्रयत्न केला . 
मात्र पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाब यांनी हा निधी घेणार नसल्याचे सांगितले . 

त्यामुळे जमा केलेला निधीचे डबे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी डॉ संतोष थिटे यांच्या कडे सुपूर्द केले . तसेच प्रांत अधिकारी व पालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. 

भिवंडी शहरातील सार्वजनिक रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे.त्यामुळे अपघात,वाहतूक कोंडीसारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

असे असताना पालिका प्रशासन रस्ते दुरूस्ती व स्वच्छतेसाठी निधी नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकत असल्याने महापालिका प्रशासन व पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना जागृत करण्यासाठी तसेच पालिकेस अर्थिक मदत करण्यासाठी ' आम्हीं भिवंडीकर ' संघर्ष समितीच्यावतीचे अध्यक्ष सुहास बोंडे यांचे नेतृत्वाखाली आज सकाळी  शहरातील महिला व नागरिकांनी हातामध्ये डबे घेऊन .भिख मांगो मोर्चा आंदोलन शिवाजी चौकातून सुरु केले . 

बाजारहाट करण्यासाठी निघालेले नागरिक व दुकानदारांकडून हा निधी डब्यामध्ये ढोल ताशा वाजवून जमा केला जात होता. या वेळी संतप्त नागरिकांनी पालिका प्रशासन व नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली . 

शिवाजी चौक येथून निघालेला मोर्चा कासार आळी, ,ठाणगेआली ,पारनाका, बाजारपेठ,प्रभुआळी,मंडई ,नाविचाळ ,तीनबत्ती ,कोटर गेट,निजामपुरा ,मार्गे महापालिका कार्यालय येथे पोहोचला  . 

  शहरातील नागरिकांना पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे खराब रस्ते,स्वच्छता,पिण्याचे पाणी आदी विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे.

या समस्यांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र प्रशासन अधिकारी ,कर्मचारी त्याकडे सराईतपणे दुर्लक्ष करीत आहे.

पालिकेकडे निधी नाही अशी दिशाभूल करणारी माहीती देवून प्रशासन रस्ते दुरूस्ती करीत नाही असा आरोप यावेळी मोर्च्यातील  नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत केला .

नागरिकांना सुविधा द्या  अशी मागणी करून भीक मागून जमा केलेल्या निधीचे डब्बे पालिका प्रशासनाने स्वीकारावे व विकास कामांसाठी या निधीचा वापर करावा असे त्यांनी सांगितले . 

मात्र अतिरिक्त आयुक्त यांनी निवेदन स्वीकारून निधी घेण्यास नकार दिला त्यामुळे जमा केलेला निधीचे 33 डब्बे  प्रांत अधिकारी डॉ थिटे यांच्याकडे देण्यात आले .  

या मोर्च्यात संघर्ष समितीचे अध्यक्ष सुहास बोन्डे ,धनपाल देशमुख ,मोहन वलाळ,नारायण जाधव,आलम फारुकी पुनमताई बोंडे ,रोमा निलेश आळशी ,वृषाली कोंडलेकर ,आरर्शी बोंडे, संजय चौव्हाण ,आर. मिश्रा यांच्यासह शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख