bhivandi | Sarkarnama

भिवंडीत 26 गुंड हद्दपार, 56 जणांवर कारवाई

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

भिवंडी : राज्यात अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुका निर्भयपणे शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी पहिल्या टप्यात 26 गुंडाना हद्दपार तर 56 गुन्हेगारांवर मोक्का कायदाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच 900 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस उपयुक्त मनोज पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. 

भिवंडी शहरात निवडणुकीच्या वादातून कॉग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांचा खून करण्यात आला. शहर पोलीस ठाण, निजामपुरा, नारपोली, शांतीनगर या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये हाणामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. उपायुक्त पाटील पुढे म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी पोलीस दल सुसज्ज झाले असून सुरक्षेतेच्या दुष्टीकोनातून पोलिसांनी हिटलिस्ट वर असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपारी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सुरवात केली आहे. 
गुप्तचार विभागाने सतर्कतेचा इशारा दिल्याचे सांगत पाटील म्हणाले, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी शहरात जादा पोलीस फोर्स बंदोबस्तासाठी मागविण्यात आला आहे. शहरात शांतता रहावी म्हणून चार चाकी व दुचाकी मोटारसायकल रॅलीला बंदी घातली असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. तसेच 14 वर्ष खालील मुला, मुलींना व प्राण्यांचा प्रचारात उपयोग कारण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे प्रकार आढळल्यास उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी 644 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली असून या केंद्रांवर 1288 पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत तसेच एस आर पी व रॅपिड ऍक्‍शनफोर्सच्या कंपनी मागविण्यात आल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख