Bhimandi Chief Medical Officer Sacked | Sarkarnama

भिवंडी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची पदावरून उचलबांगडी

शरद भसाळे
मंगळवार, 14 मे 2019

 भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणात अडकलेल्या महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांची पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी मुख्य वैद्यकीय पदावरून अखेर काल तडकफडकी उचलबांगडी करून प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. जयवंत धुळे यांची नियुक्ती केली आहे.

भिवंडी  :  भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणात अडकलेल्या महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांची पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी मुख्य वैद्यकीय पदावरून अखेर काल तडकफडकी उचलबांगडी करून प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. जयवंत धुळे यांची नियुक्ती केली आहे. तसेच डॉ. शेट्टी यांनी तातडीने त्यांच्या पदाचा पदभार डॉ. धुळे यांच्याकडे सुपूर्द करावा असे लेखी आदेश दिले आहेत.त्यामुळे पालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे.

भिवंडी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या डॉ. विद्या शेट्टी यांनी शासनाकडून येणाऱ्या औषधांचा पुरवठा व प्रशासकीय कामात अनियमितता ठेवून आर्थिक अपहार केला.अशी तक्रार पालिकेचे महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे व पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे केली होती.त्यामुळे आयुक्त मनोहर हिरे यांनी तातडीने चौकशी समिती नेमून त्यास अधीन राहून अखेर आज सायंकाळी डॉ.विद्या शेट्टी यांची पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी डॉ. जयवंत धुळे यांची नेमणूक केली आहे. याबाबत उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी डॉ. धुळे यांना तातडीने पदभार स्वीकारण्यासाठी लेखी पत्र दिले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख