bhima korgaon andraj ambedkar | Sarkarnama

कोरेगाव भीमा येथे सभेला परवानगी दिली नाही. तरी, आम्ही सभा घेणार : आनंदराज आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाबाबत राज्य शासन गंभीर नाही. येथे सभेला परवानगी दिली नाही. तरी, आम्ही सभा घेणारच असा इशारा देतानाच एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमानिमित्त कोणत्याही उपाय योजना करण्यात येत नाहीत.सुरक्षिततेसाठीदेखील काहीही केलेले नाही, असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. 

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले, "" एक जानेवारी रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासनाने पुरेशी तयारी केलेली नाही. प्रशासनाकडे कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीची मागणी करूनही नियोजन बैठक घेतली जात नाही. गेल्यावर्षी झालेली घटना पुन्हा होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी करायला हवी आहे. मात्र, प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.'' 

गेली अनेक वर्ष याठिकाणी अभिवादन दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम होतात. पण, सरकारमधील एक मंत्री म्हणतात, यावर्षी कोणालाही येथे सभा घेऊ दिली जाणार नाही. पण, सभेला परवानगी दिली नाही. तरी, आम्ही सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

यावेळी आंबेडकर यांनी या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ते म्हणाले, ""कार्यक्रम ठिकाणी स्वच्छ पाणी, वाहन पार्किंगची सुविधा, शिक्रापूर बायपास व खराडी बायपासपासून वाहतूक वळवून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अतिदक्षता विभाग निर्माण करून मेडिकल सुविधा उपलब्ध करण्यात यावी, परिसरातील गावकऱ्यांनी गाव बंद करू नये यासाठी उपाययोजना करणे, परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावीत.'' 

प्रशासनाने एक जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावी अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख