आजचा वाढदिवस : भाऊसाहेब राजाराम वाकचौरे - माजी खासदार, शिर्डी (शिवसेना) - bhausaheb wakchure ex mp | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : भाऊसाहेब राजाराम वाकचौरे - माजी खासदार, शिर्डी (शिवसेना)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 जानेवारी 2018

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून 2009 मध्ये निवडणूक लढवून तब्बल दीड लाख मताधिक्‍क्‍याने विजय मिळविला होता. खासदार म्हणून संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात ते सहभागी झाले आणि चौथा प्रश्न विचारण्याचे भाग्य त्यांना लाभले. देशभरातील रेल्वेसेवा, नगर जिल्ह्यातील रेल्वेसेवेबाबत त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन काही प्रश्न मार्गी लावले होते. तब्बल 35 चर्चेला त्यांनी लोकसभेत हजेरी लावून 87 विषयांवर चर्चा केली होती. त्यांनी अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. काष्ट्राईब कर्मचारी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून 2009 मध्ये निवडणूक लढवून तब्बल दीड लाख मताधिक्‍क्‍याने विजय मिळविला होता. खासदार म्हणून संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात ते सहभागी झाले आणि चौथा प्रश्न विचारण्याचे भाग्य त्यांना लाभले. देशभरातील रेल्वेसेवा, नगर जिल्ह्यातील रेल्वेसेवेबाबत त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन काही प्रश्न मार्गी लावले होते. तब्बल 35 चर्चेला त्यांनी लोकसभेत हजेरी लावून 87 विषयांवर चर्चा केली होती. त्यांनी अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. काष्ट्राईब कर्मचारी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. बालपणापासून त्यांनी गरिबीचे चटके अनुभवले आहेत. प्रारंभी अकोले खरेदी विक्री संघात कारकुनाची नोकरी केली. नंतर जिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेत उपकार्यकारी अधिकारी म्हणून नोकरी केली. शिर्डीत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. शिर्डीतील विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख