विखे समर्थकाला शब्द देवून थोरातांनी कारखाना केला बिनविरोध!

तालुक्याच्या विकासात हृदय म्हणून काम करणार्‍या या कारखान्याच्या संचालकपदासाठी तोलामोलाच्या इच्छुकांची मोठी संख्या होती. संगमनेरच्या चांगल्या राजकारणाची परंपरा कायम ठेवीत कारखाना व तालुक्याच्या हिताकरीता माघार घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रीया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
suger factory election
suger factory election

संगमनेर :  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. त्यामुळे पुन्हा एकदा थोरातांचे वर्चस्व यामुळे सिध्द झाले आहे.

थोरात कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सन 2020 - 2025 साठीच्य़ा पंचवार्षिक निवडणूकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी, शेतकरी विकास मंडळाच्या सर्व विरोधकांनी अर्ज माघारी घेतल्याने, ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे यांनी घोषित केले.  या कारखान्याच्या 22 हजार 500 सभासदांमधून संचालक पदाच्या 21 जागांसाठी सुमारे 382 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र नव्या जुन्यांचा मेळ घालत शेतकरी विकास मंडळाने दिलेल्या उमेदवारांसाठी इतरांनी माघार घेत, संगमनेरच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवली. 

नवीन संचालक मंडळ
नवीन संचालक मंडळात सोसायटी मतदार संघातून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साकुर गटातून इंद्रजित थोरात, इंद्रजित खेमनर, मिनानाथ वर्पे, जोर्वे गटातून बाबा ओहोळ, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, तळेगाव गटातून संपतराव गोडगे, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, धांदरफळ गटातून रमेश गुंजाळ, विनोद हासे, अनिल काळे, अकोले - जवळे कडलग गटातून चंद्रकांत कडलग, संतोष हासे, भास्करराव आरोटे भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून गणपतराव सांगळे, अनुसुचित जातीजमाती मतदार संघातून माणिक यादव, इतर मागास वर्गीय मतदार संघातून अभिजीत ढोले, तर महिला राखीव मतदार संघातून मिरा वर्पे व मंदा वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

विरोधी गटातील विखे समर्थक जयश्री गणपत शिंदे यांचा अर्ज शेवटपर्यंत बाकी होता. इंद्रजीत थोरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, आर.एम.कातोरे तसेच अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी विरोधी गटाचे नेते अँड. भास्कर दिघे, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शरद थोरात, संतोष रोहोम, सचिन शिंदे, गणपत शिंदे यांच्याशी चर्चा करुन, संचालक मंडळात तज्ज्ञ संचालक म्हणून घेण्याचा शब्द दिल्यानंतर जयश्री शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com