मी गद्दार नाही: भाऊसाहेब कांबळे

माझ्या पक्षप्रवेशाचे त्यांना वाईट वाटले असले, तरी सामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मी गद्दार नाही: भाऊसाहेब कांबळे

श्रीरामपूर (नगर) : आमदार भाऊसाहेब कांबळे यापूर्वी कोठे होते, माहीत नाही; परंतु आता ते शिवसैनिक आहेत. शहरात त्यांना उद्देशून लावलेल्या फलकासंदर्भात पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करावी; अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रावसाहेब खेवरे यांनी आज दिला.

गद्दार कोण आहे, हे जनता जाणून आहे. आपण गद्दारी केली नाही. फलकामुळे वातावरण तंग झाले; मात्र आपण पोलिसांना फलक काढण्यास सांगितले. मुख्याधिकारी व पोलिसांनी फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी कांबळे व खेवरे यांनी संवाद साधला. जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख सचिन बडदे, डॉ. महेश क्षीरसागर, सदा कराड आदी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, "शहरातील कॉंग्रेसमधील विरोधी गट गटबाजी करून त्रास देण्याचे काम करीत आहे. माझ्या पक्षप्रवेशाचे त्यांना वाईट वाटले असले, तरी सामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. फलकाच्या घटनेनंतर आपणच दक्षता घेत, फलक हटविण्यास सांगितले. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी फलकास परवानगी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासन व पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.''

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com