श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार शिवसेनेत दाखल 

ठाकरे यांनी कांबळे यांच्या हातात शिवबंधन बांधून हाती भगवा झेंडा दिला.
श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार शिवसेनेत दाखल 

नगर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आज सदस्यत्त्वाचा राजीनामा देत शिवधनुष्य हाती घेतले. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा कडवा विरोध असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे तसेच काही निवडक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केला. कांबळे यांना लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातूनही मताधिक्य घेता आले नाही. ते शिवसेनेत आले तरी त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली, मात्र त्यावरही मात करून कांबळे आज शिवसेनेत दाखल झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com