भास्कर जाधव - योगेश कदम यांची  भाजपच्या  बंडखोरीमुळे कोंडी  

jadhav-kadam
jadhav-kadam

रत्नागिरी  :  जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात चाळीस उमेदवार रिंगणात असून अर्ज माघारीची अंतिम मुदत सोमवारी (ता. 7) आहे. त्यामुळे रिंगणात असलेले कोण उमेदवार माघार घेणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघात भाजपकडून तर एका ठिकाण काँग्रेसने बंडखोरी केली आहे. बंडोबा थंड होणार की रिंगणात राहून तिढा निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने भाजपकडून चार मतदारसंघात निशाण फडकवले. रत्नागिरी वगळता दापोली-खेड, गुहागर, चिपळूण, राजापूरात त्याचे पडसाद उमटले.

 गुहागर मतदारसंघात भाजपचे रामदास राणे रिंगणात आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणबी कार्डाचा वापर करत शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य सहदेव बेटकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. 

हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने फडकवलेले बंडाचे निशाण शिवसेनेसाठी अडचणीची ठरु शकते. बेटकर यांना चांगले पाठबळ मिळत असून शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांना तगडी लढत देतील अशी चर्चा सुरु आहे. या परिस्थितीत भाजपचा पाठिंबा शिवसेनेसाठी उपयुक्त ठरु शकतो.

दापोलीत भाजपचे निष्ठावंत केदार साठे रिंगणात असल्याने शिवसेनेचे योगेश कदम यांच्यासाठी अडचणी आहेत. विद्यमान आमदार संजय कदम यांच्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण असून योगेश रिंगणात असले  तरीही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचेच आव्हान त्यांच्यापूढे आहे. 

चिपळुणातील लढत अत्यंत चुरशीची असून दोन्ही पक्षाकडून बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न सुरु होते; मात्र भाजपकडून तुषार खेतलांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने शिवसेनेचे डोकेदुखी वाढू शकते. वर्चस्व असलेला चिपळूण शहरातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते अर्ज भरतेवेळी शिवसेनेच्या रॅलीत उपस्थित होते. त्यामुळे खेतलांच्या गटाचा प्रभाव कमी झाला आहे.

राजापुरात भाजपची ताकद यथातथाच असल्याने रिंगणात उतरलेल्या संतोष गांगणांची खेळी त्रासदायक ठरणे अशक्य आहे.

सिंधुदुर्गत एका जागेसाठी शिवसेनेकडून सुरु असलेला अट्टाहास मोडीत काढण्यासाठी भाजपने दबावतंत्र अवलंबले आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार जागा पणाला लावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com