शिवसेना, भाजपाच्या साठमारीत कोकणचा बट्ट्याबोळ - भास्कर जाधव 

 शिवसेना, भाजपाच्या साठमारीत कोकणचा बट्ट्याबोळ - भास्कर जाधव 

वेंगुर्ले : राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यात चांगले वातावरण असून लोकांना आता बदल हवा आहे. विधानसभेत देशात राज्यात जरी भाजपाची सत्ता असली तरी कोकणात मात्र कुठेही नाही. तर शिवसेना व भाजपाच्या राजकीय साठमारीमध्ये कोकणचा बट्ट्याबोळ झाल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक भास्कर जाधव यांनी येथे केली.

जिल्ह्यातील सावंतवाडी व कणकवली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज कॅम्प येथील महिला काथ्या कारखान्याच्या कार्यालयात झाल्या.

यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""जनतेला आता निष्क्रिय व घोषणांचा पाऊस पडणारे सरकार नको. प्रत्यक्ष कृती करणारे व शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या जीवनामध्ये नवीन बदल घडवणारे सरकार पाहिजे. कोकणात भाजपा कुठेही नसून याठिकाणी शिवसेना व कॉंग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जरी शिवसेना भाजप युतीमध्ये असले तरीही गेल्या पाच वर्षात कोकणातील सेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी शिवसेनेची कोंडी केली आहे. यामुळे विकास कामे ठप्प आहेत. ती कोंडी मोडण्याचे कौशल्यही शिवसेनेकडे नाही. या दोघांच्या भांडणाशी जनतेचे काही देणेघेणे नसून यावेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीलाच जनता साथ देईल.''

यावेळी अर्चना घारे-परब, एम. के. गावडे, सुरेश गवस, प्रदेश उपाध्यक्ष अमित सामंत, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, रत्नागिरी जिल्हा बॅंक संचालक श्री. सुर्वे, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सरोज परब, शिवाजी घोगळे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्यासाहित जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार गावडे यांनी या आपले शक्तिप्रदर्शन दाखवले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची नावे आचारसंहिता लागण्यापूर्वी एक महिना अगोदर जाहीर व्हावीत, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले.

हे आहेत इच्छुक उमेदवार
यावेळी श्री. जाधव आणि सौ. घारे-परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रांतिक सदस्य एम. के. गावडे तर कणकवली विधानसभा मतदार संघासाठी अभिनंदन मालणकर यांच्या मुलाखती घेतल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com