bhaskar jadhav joins shivsena | Sarkarnama

`माझा मूळ स्वभाव स्वस्थ बसू देत नसल्याने पुन्हा शिवसेनेत'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

``मी मूळचा शिवसैनिक आहे. माझा अंतरात्मा शिवसेनेचा आहे. त्यामुळे माझा मूळ स्वभाव स्वस्थ बसू देत नसल्याने मी पुन्हा स्वगृही शिवसेनेत आलो आहे,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी आज शिवसेना प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई - ``मी मूळचा शिवसैनिक आहे. माझा अंतरात्मा शिवसेनेचा आहे. त्यामुळे माझा मूळ स्वभाव स्वस्थ बसू देत नसल्याने मी पुन्हा स्वगृही शिवसेनेत आलो आहे,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भास्कर जाधव यांनी आज शिवसेना प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री भास्कर जाधव यांनी आज दुपारी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी जाधव यांच्या हाती भगवा देत शिवबंधन बांधले. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

शिवसेना प्रवेशानंतर बोलताना जाधव म्हणाले, की आमच्यात कोणतेही भांडण किंवा आरोप नाहीत. आमच्यात निर्माण झालेले गैरसमज, ढग निवळले आहेत. मी मिलिंद नार्वेकरांवर कधीही आरोप केलेले नाहीत. तसा माझा स्वभाव नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख