राष्ट्रवादी सोडल्याची भास्कर जाधव यांना रुखरुख?

मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे जाधव यांना भ्रमनिरास झाला. राष्ट्रवादी सोडला नसता तर मंत्रिपद नक्‍की मिळाले असते, असे त्यांचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.
Bhaskar Jadhav Repentant about Leaving NCP
Bhaskar Jadhav Repentant about Leaving NCP

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोंडी होत असल्यानेच माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण मंत्रिमंडळ विस्तारात संधी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्याची रूखरूख त्यांच्या मनात असल्याचे जाधव यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत.

शिवसेनेत असताना कोकणातील आक्रमक नेत्यांमध्ये भास्कर जाधव यांची गणना होते. 1999 मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडून आलेल्या जाधव यांना 2004 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. परिणामी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत कालांतराने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मंत्री, प्रदेशाध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे त्यांना मिळाली

कोकणातील राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याशी त्यांचे बिनसले. उभयतांमधील वाद वाढत गेला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने या वादाकडे कानाडोळा केला. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत तटकरे यांच्याकडून दगाफटका होण्याची भीती जाधव यांना होती. सुमारे 15 वर्षांनी त्यांनी शिवसेनेत फेरप्रवेश केला तेव्हा त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 

मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे जाधव यांना भ्रमनिरास झाला. राष्ट्रवादी सोडला नसता तर मंत्रिपद नक्‍की मिळाले असते, असे त्यांचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली. 2019 मध्ये पक्षात घेऊन मंत्रिपद नाकारण्यात आले. यामुळे शिवसेनेत प्रवेश करून काय साधले, असा प्रश्न जाधव यांना भेडसावू लागल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

कोणाला मंत्री करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो.ज्येष्ठतेच्या मुद्दयावर आपला विचार व्हायला पाहिजे होता, ही आपली ठाम भावना आहे. अर्थात पक्षाचा निर्णय मला मान्य आहे - भास्कर जाधव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com