भास्कर जाधव खूप काही बोलले पण मंत्रिपदाविषयी अवाक्षरही नाही काढले !  

भाजपने युतीचा धर्म पाळला नाही. महाविकास आघाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी टीका केली तर त्यांना चोख उत्तर द्या. -भास्कर जाधव
Bhaskar Jadhav didint talk on missing the ministerial berth
Bhaskar Jadhav didint talk on missing the ministerial berth

चिपळूण :  महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे जाधव नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत ते कार्यकर्त्यांशी काहीतरी बोलतील, असे सर्वांना वाटले होते; परंतु शिवसेना भवन येथील बैठकीत त्यांनी नाराजीचा शब्दही काढला नाही.     


राजकारणात माझ्याइतका भाग्यवान माणूस कोणी नाही, असे उद्‌गार गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काढले.  

दादर येथील शिवसेना भवनात आमदार जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, " कोकणात पक्ष बदलून चालत नाही. पण परिस्थितीनुसार मला कधी पक्ष, तर कधी चिन्ह बदलावे लागले. राजकीय सुरवात शिवसेनेतून झाली. पक्ष वाढवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. याच संघर्षातून मतदारसंघही बदलला. "


" प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी मला पाठीशी घालण्याचे काम केले. अपक्ष निवडणूक लढवली, तेव्हा पन्नास हजार कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले. कार्यकर्त्यांच्या बळामुळेच मी सहावेळा आमदार म्हणून निवडून आलो. राष्ट्रवादीत असताना पक्षाचा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री झालो, तोही कार्यकर्त्यांमुळेच. आता ज्येष्ठ झालो असलो तरी मतदारसंघ आणि कार्यकर्त्यांपासून बाजूला जाणार नाही. मला सत्तेचा लोभ नाही. मी अधूनमधून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत राहणार आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले. 


विरोधी पक्षात असतानासुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला लाजवेल, एवढी विकासाची कामे आपण मतदारसंघात केली. या वेळी तर सत्तेत आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्‍न घेऊन माझ्याकडे या. तुमच्या स्वागतासाठी मी तयार असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.

...तर भाजपला चोख उत्तर द्या
गुहागरमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी वाढवण्याचे काम केले. शिवसेनेत आल्यानंतर युतीचा धर्म पाळत भाजपबरोबर घेऊन सत्तेचा निम्मा वाटा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपने युतीचा धर्म पाळला नाही. महाविकास आघाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी टीका केली तर त्यांना चोख उत्तर द्या, असे आवाहन जाधव यांनी केले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com