भाजप उमेदवार भारती पवारांच्या जाऊबाई म्हणतात.....आम्ही राष्ट्रवादीलाच आघाडी देऊ

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधुन भाजपत प्रवेश करुन उमेदवारी मिळविलेल्या भारती पवार यांना अद्याप प्रचाराला सुरवातही केली नाही. त्या आधीच त्यांच्या जाऊबाई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी मेळावा घेतला. या भरगच्च मेळाव्यात, "राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला साडे बारा वर्षे लाल दिवा दिला. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारालाचे मोठे मताधिक्‍य मिळवुन देऊ," असा निर्धार व्यक्त केला.
भाजप उमेदवार भारती पवारांच्या जाऊबाई म्हणतात.....आम्ही राष्ट्रवादीलाच आघाडी देऊ

कळवण : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधुन भाजपत प्रवेश करुन उमेदवारी मिळविलेल्या भारती पवार यांना अद्याप प्रचाराला सुरवातही केली नाही. त्या आधीच त्यांच्या जाऊबाई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी मेळावा घेतला. या भरगच्च मेळाव्यात, "राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला साडे बारा वर्षे लाल दिवा दिला. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारालाचे मोठे मताधिक्‍य मिळवुन देऊ," असा निर्धार व्यक्त केला.

कौटुंबिक कलहामुळे भारती पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी हुकली. त्यांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळवली. अद्याप त्यांनी प्रचाराला सुरवात केलेली नाही. भाजपच्या नाराज मंडळींच्या गाठीभेटीही सुरु केल्या नाहीत. तोच त्यांच्या भाऊबंदकीने त्यांचा मार्ग पुन्हा रोखला आहे. त्यांच्या जाऊबाई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी कळवण, सुरगाणा मतदारसंघांत मेळावे घेऊन आघाडी घेतली. या मेळाव्यात कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार धनराज महाले, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. दोन्ही कॉंग्रेससह रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, प्रहार या पक्षांची मोट बांधण्यातही त्यांना यश आले.

यावेळी नितीन पवार म्हणाले, ''महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव उदाहरण आहे की एखाद्या धरणाला नेत्याचे नाव देणे. कॉंग्रेस आघाडी सरकारने पुनंद प्रकल्पाला अर्जुन सागर नाव दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच साडे बारा वर्षे आमच्या घरात लाल दिवा होता. या पक्षाने आम्हाला भरभरुन दिले. त्याचा उपयोग आम्ही कळवण परिसराच्या सेवेसाठी केला. जनतेच्या विकासासाठी झटलो. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला या भागातुन मोठी आघाडी देणे, हे आमचे कर्तव्य आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनराज महालेच विजयी होतील.''

ते पुढे म्हणाले, "भाजप, शिवसेना युतीच्या राज्यात या तालुक्‍याला सध्या कोणी वाली नसल्याने विकासकामे ठप्प आहेत. पुनंद प्रकल्पातून भाजप सरकार पाणी पळविण्याच्या तयारीत आहे. आम्ही त्यांचे नियोजन उधळून लावले. कळवण तालुक्‍यातील पाण्यावर कळवण तालुक्‍यातील जनतेचाच पहिला हक्क आहे. त्यासाठी आपला पाण्यासाठी लढा सुरूच राहील. त्यासाठी कॉंग्रेस आघाडीच्या या बालेकिल्ल्यात भाजपला पिछाडीवरच रहावे लागेल."

स्वतःच्या जाऊबाईच पदर खोचून विरोधकांच्या प्रचारात सक्रीय नव्हे तर आघाडीवर असल्याने भारती पवार यांच्या चिंतेत भर पडणार आहे. दोन जाऊबाईंत कोणत्या जाऊबाई राजकीय प्रचारात आघाडीवर राहतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, भाजपच्या भारती पवारांना घरातूनच आव्हान मिळाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com