उद्या राष्ट्रवादीच्या भारती पवारांचा भाजप प्रवेश; हरिश्चंद्र चव्हाणांचे भवितव्य काय?

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारीसाठी होकार दिला आहे. उद्या (ता.22) दुपारी एकला त्या आपल्या समर्थकांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली. त्यामुळे तीन टर्म खासदार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांचे भवितव्य काय, अशी चर्चा राजकीय गोटात सुरु झाली आहे.
उद्या राष्ट्रवादीच्या भारती पवारांचा भाजप प्रवेश; हरिश्चंद्र चव्हाणांचे भवितव्य काय?

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांना भाजपने उमेदवारीसाठी होकार दिला आहे. उद्या (ता.22) दुपारी एकला त्या आपल्या समर्थकांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात एकाच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपासाठी हा 'शॉक' ठरणार आहे. त्यामुळे तीन टर्म खासदार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांचे भवितव्य काय, अशी चर्चा राजकीय गोटात सुरु झाली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीबाबत गेले दोन आठवडे खल सुरु होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथुन शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीच्या दावेदार डॉ. भारती पवार नाराज होत्या. त्यांच्या नाराजीचा लाभ उठवत भाजपने त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याबाबत गेल्या चार दिवसांत दोन वेळा चर्चा झाली होती. मात्र, उमेदवारीला स्पष्ट होकार असेल तरच प्रवेश करण्याची अट भारती पवार यांनी घातली होती. त्यामुळे बुधवारी होणारा त्यांचा प्रवेशही लांबणीवर पडला होता. त्यामुळे काल सायंकाळी त्याबाबत वेगवान हालचाली होऊन त्यांना उमेदवारीला होकार देण्यात आला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. २२) उद्या मुंबईत त्यांचा प्रवेश होणार आहे.

खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यापूर्वी तीन टर्म खासदार आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. विशेषतः प्रतिस्पर्धी पक्षांत ते विशेष लोकप्रिय राहिले आहेत. मात्र, ही वैशिष्ठ्येच यंदा त्यांच्या उमेदवारीच्या आड आली आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सोशल मिडीयातील 'ऍक्‍टीव्हनेस', खासगी संस्थांचे सर्व्हेक्षण हे जास्त महत्वाचे निकष झाले. विशेष म्हणजे सध्या उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी गिरीष महाजन यांच्या शब्दाला किंमत आहे. यामध्ये खासदार चव्हाण यांच्याविषयी निगेटिव्ह मत आहे. चव्हाण समर्थकांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी जामनेर येथे महाजन यांच्या भेटीला गेले होते. या वेळी महाजन यांनी मी तुमच्यासोबत असून, तुम्ही मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना भेटा, असा सल्ला दिला होता.

त्यानुसार बुधवारी चांदवड, कळवण, दिंडोरी, निफाड, येवला व नांदगाव तालुक्‍यातील मुख्य पदाधिकारी असलेल्या समर्थकांचे शिष्टमंडळ मुंबईत गेले होते. स्वतः चव्हाणांसह आमदार डॉ. राहुल आहेर, प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, संपत नागरे, आनंद शिंदे, मनोज दिवटे, संतोष पलोड, भूषण कासलीवाल, विकास देशमुख, श्री. कोठावदे, भागवत बोरस्ते आदी मुख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, यातील अनेक पदाधिकारीच मनाने त्यांच्या विरोधात असल्याने भारती पवार यांचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com