भालके काँग्रेसमध्ये होते तरीही पवारांचेच समर्थक होते!

शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आमदार समर्थकांच्या रांगा लागल्या आहेत.
bharat bhalke
bharat bhalke

पंढरपूर : उद्धव ठाकरे सरकारचे खातेवाटप अजून निश्चित झाले नसले तरी मंत्रीमंडळात संधी मिळण्यासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांनी लॉबिंग सुरु केले आहे. शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आमदार समर्थकांच्या रांगा लागल्या आहेत.

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी, या मागणीसाठी  विजयसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी जावून भेट घेतली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा 13 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. यापूर्वी दोनवेळा आमदार भालकेंनी पंढरपूर मतदार संघातून विजय मिळवला आहे.  2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी आमदार भालकेंची राज्यात जायंटकिलर म्हणून ओळख झाली. त्यानंतर 2014 साली भाजप पुरस्कृत उमेदवार प्रशांत परिचारकांचाही त्यांनी पराभव केला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदीची हवा असतानाही आमदार भालकेंनी पंढरपुरात तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रीक करत भाजप उमेदवाराचा पराभव केला.

भारत भालके हे पूर्वीपासून शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेसमध्ये असतानाही त्यांची शरद पवारांचे समर्थक म्हणून ओळख कायम होती. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार भालकेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन निवडणूक जिंकली आहे.  

मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे, माजी नगराध्यक्ष महादेव भालेराव, सुधीर धुमाळ, सुभाष हुंगे पाटील, वैभव लिंगे यांनी शरद पवारांची भेट घेवून आमदार भालकेंना मंत्री मंडळात संधी देण्याची मागणी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com