भारत भालके कुंपणावर : म्हणाले , सध्या मी पंढरपुरातच आहे

आमदार माने हे मुळचे इंदापूरचे असून ते अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर बबन शिंदे हे निवडणुकीपर्वीच भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळे आमदार शिंदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
bharat Bhalke
bharat Bhalke

पंढरपूर :  राज्यातील नाटयम राजकीय घ़डामोडीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांचे अजित पवारांसोबत की शरद पवारांसोबत जाणार या  विषयी पक्षामध्येच मोठा संभ्रम  निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंना तुम्ही कोणासोबत जाणार या विषयी  विचारले असता, यातील मला काहीच माहिती नाही,सध्या मी पंढरपुरातच आहे , असं सावध आणि सूचक विधान केलं आहे. 

भालकेंच्या या सूचक विधानामुळे  अजित पवारांसोबत जाणार की शरद पवारांसोबतच राहणार या विषयी  राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले आहेत.यामध्ये पंढरपूरमधून भारत भालके, माढ्यातून बबन शिंदे आणि मोहोळमधून यशवंत माने, आमदार माने हे मुळचे इंदापूरचे असून ते अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर बबन शिंदे हे निवडणुकीपर्वीच भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळे आमदार शिंदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


 बबन शिंदे आज त्याच्या माढा य़ेथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यांनी याबाबत आपणास काहीच माहिती नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असल्याचे सांगितले. तर मोहोळचे आमदार यशवंत माने हे नाॅट रिचेबल आहेत. आमदार भालके, शिंदे आणि माने हे तीन्ही राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत जातील अशीच चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com