Bharat Bhalke presents silver gada to Sharad Pawar | Sarkarnama

नामवंत राजकीय मल्लांना आस्मान दाखवणाऱ्या पवारांना भालकेंनी दिली चांदीची गदा !

भारत नागणे 
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

आमदार भारत भालके हे स्वतः देखील कसलेले पैलवान आहेत. कुस्ती मधूनच आमदार भालके यांची पवारां सोबत पहिली ओळख झाली. पुढे कुस्तीत झालेली ओळख राजकारणात कायम टिकून आहे.

पंढरपूर : आमदार भालके यांनी  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आज त्यांच्या   ऐंशीव्या  वाढदिवसाचे औचित्य साधून   मल्ल विद्येचे आणि   विजयाचे प्रतीक असलेली चांदीची गदा भेट दिली. कुस्ती क्षेत्रात अनेकांचे वस्ताद असलेले पवार राजकारणात देखील विरोधकांना  वस्ताद म्हणून ते  भारी ठरले आहेत. 

विधानसभा निवडणुक प्रचारा दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या समोर पैलवान नाही अशी टिका राष्ट्रवादीवर केली होती. फडणवीसांच्या या टिकेला शरद पवारांनी तसेच चोख प्रत्युत्तर दिले होते. परंतु ऐंशी वर्षाच्या या पहेलवानाने भल्या भल्याना अस्मान दाखवत राजकारणातील महाराष्ट्र केसरी हा 'किताब पटकावला अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. 

दरम्यान मंगळवेढा येथे जाहीर सभेत अजित पवार यांनी आमदार भारत भालके हे आमचे पैलवान  भारी ठरतील असा भाजपवर  पलटवार केला होता.निवडणूकीत अपेक्षे प्रमाणे आमदार भालके यांनी बाजी मारली. आमदार भारत भालके हे स्वतः देखील कसलेले पैलवान आहेत. कुस्ती मधूनच आमदार भालके यांची पवारां सोबत पहिली ओळख झाली. पुढे कुस्तीत झालेली ओळख राजकारणात कायम टिकून आहे.

आमदार भारत भालके हे शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सध्या राज्य मंत्री मंडळात त्यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे.आज शरद पवाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुस्तीतील विजयाचे प्रतीक असलेली गदा शरद पवारांना भेट देवून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी लतीफ तांबोळी,संतोष सुळे, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख