आमदार भालके, परिचारकांच्या शक्तिप्रदर्शनानंतरही  लढतीचा `सस्पेन्स'!

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत परिचारक व आमदार भारत भालके यांनी विधानसभेपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. आमदार भालकेंनी पक्ष प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवल्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात लढत नेमकी कशी होणार, याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली.
Samadhan Awatade Bharat Bhalake Prashant Paricharak
Samadhan Awatade Bharat Bhalake Prashant Paricharak

मंगळवेढा - पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत परिचारक व आमदार भारत भालके यांनी विधानसभेपूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन केले. आमदार भालकेंनी पक्ष प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवल्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात लढत नेमकी कशी होणार, याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली.

सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गर्दी वाढू लागल्याने सत्ताधारी पक्षातून आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेना व भाजपा यांच्यात ही जागा कोणाला सुटणार हे देखील अजून गुलदस्त्यात आहे.

दरम्यान शैला गोडसे यांनी शिवसेनेतून मुंबई येथे मुलाखत दिली. त्यामुळे  शिवसेनेतून गतवेळी चाळीस हजार मते मिळणारे समाधान आवताडे यांनी या मुलाखतीला दांडी मारली आहे. आवताडे यांनी आपणाला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळेल या आशेवर मतदारसंघात यांनी गाव भेट दौरा केला. परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्यामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील आणि आमदार परिचारक यांची भुमिका निर्णायक ठरणार आहे.

आमदार भालकेंनी जर भाजपात प्रवेश केला तर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर थांबावे लागेल. त्यामुळे समाधान आवताडे यांना आघाडीतून उमेदवारी लढवावी लागेल. आमदार भालके यांनी काँग्रेस पक्ष सोडला  नसल्यामुळे काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला नाही. जर भालकेंनी काँग्रेस सोडली तर शिवाजी काळुंगे या उमेदवारांची दावेदार होऊ शकतात. त्यामुळे आवताडे यांच्यासमोर कोणत्या पक्षाचा झेंडा असणार हे देखील पाहावे लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव  आवताडे यांचे देखील सहकारात एक हाती वर्चस्व आहे. तसेच तालुक्यांमध्ये दोन साखर कारखाने, सूतगिरणी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व असताना आवताडेच्या चांगल्या कामाचे ब्रँडिंग करताना कमी पडत आहेत. स्वत: तालुक्याच्या प्रश्न मांडू शकतात. पण त्यांना मार्गदर्शन करणारे चुकीचे सल्ले देऊ लागल्यामुळे त्याना अडचणीचे ठरत आहे. सल्लागाराच्या गराड्यातून बाहेर पडल्याशिवाय आवताडेचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार नाही. 

परिचारक गटाने शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आमदार भालकेंनी देखील मोठे शक्तिप्रदर्शन केले. परंतु याच धर्तीवर समाधान आवताडे हे दामाजी कारखान्यावर आसवनी प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजयमामा शिंदे यांना आमंत्रित केल्यामुळे अवताडे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार होतात, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com