आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत - भारत भालके

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असताना आमदार भालके यांचा `आम्ही 80 वर्षाच्या योध्या सोबत आहोत' असा मेसेज सोशलमिडीयात फिरू लागल्यामुळे त्यांच्या अजित पवार यांच्याबरोबर जाण्याच्या चर्चेला तुर्त पूर्णविराम दिला.
आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत - भारत भालके

मंगळवेढा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असताना आमदार भालके यांचा `आम्ही 80 वर्षाच्या योध्या सोबत आहोत' असा मेसेज सोशलमिडीयात फिरू लागल्यामुळे त्यांच्या अजित पवार यांच्याबरोबर जाण्याच्या चर्चेला तुर्त पूर्णविराम दिला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे चर्चांना मोठ्या प्रमाणात जोर आला होता. परंतु त्यांनी केवळ शरद पवारांच्या आग्रहाखातर कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रचार यंत्रणेत त्यांच्या दिमतीला दस्तुरखुद्द शरद पवार पंढरपूर येथे आले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवेढ्यातील प्रचार सभेसाठी आले. या दोन्ही प्रचारसभेचा फायदा आमदार भालके यांच्या विजयासाठी झाला असल्यामुळे आमदार भालके कुणाच्या गळाला लागतात यावर खलबते सुरू झाली. दोन महिन्यांपासून शरद पवारांशी आ. भारत भालके एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे शरद पवार व भालके यांच्यातील संबंध अतिशय जवळचे असताना आजच्या खळबळ नाट्यांमध्ये भारत भालके हे अजित पवार यांच्याबरोबर जाणार की शरद पवार यांच्यासोबत राहणार याची चर्चा मंगळवेढ्याच्या राजकीय वर्तुळात सकाळपासून सुरू होती. 

मात्र, भालके यांचा मेसेज सोशल मिडियातून फिरू लागल्यावर त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आमदार भारत भालके यांच्याशी संपर्क साधला असता ते सध्या मुंबईत राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत असल्याचे कळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com