अटीतटीच्या लढतीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे 3207 मतांनी विजयी..

अटीतटीच्या लढतीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे 3207 मतांनी विजयी..

वालचंदनगर :  इंदापूरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार दत्तात्रेय भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा ३२०७ मतांनी  पराभव केला. विकासाच्या जोरावर भरणे यांना जनतेने दुसऱ्यांदा आमदार केले.

इंदापूरच्या विधानसभा निवडणणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे व भाजपचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये   अटीतटीच्या लढत झाली.  यामध्ये भरणेंचा ३२०७ मतांनी विजय झाला.

इंदापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडणूक चुरशी झाली. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने विकासाच्या जोरावर निवडणूक हातळली. भरणे यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्यासाठी १३५० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी खेचून आणला होता. तर जिल्हा परिषदेचे सभापती प्रवीण माने यांनी अडीच वर्षामध्ये २५० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला होता.

निवडणूकीच्या काळामध्ये अखेरच्या टप्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप,अशोक घोगरे यांनी भरणे यांना विरोध करुन  हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा दिला होता.  मात्र सर्वसामान्य जनता भरणेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली.  हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूकीच्या तोंडावर कॉग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जनतेला पक्षांत्तर रुचले नसावे. जनतेने दुसऱ्यांदा भरणे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com