काॅंग्रेसशी आघाडीच्या चर्चेने मी नाराज नाही; सुप्रिया सुळेंना इंदापुरातून 40 ते 50 हजाराचे लिड : भरणे

काॅंग्रेसशी आघाडीच्या चर्चेने मी नाराज नाही; सुप्रिया सुळेंना इंदापुरातून 40 ते 50 हजाराचे लिड : भरणे

वालचंदनगर : लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांना ४० ते ५०  हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळणार असल्याचा विश्‍वास आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो.  तालुक्यातील ३ लाख २ हजार १८० मतदारापैंकी  १ लाख ९४ हजार ५७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्यांदाच  लोकसभेची निवडणूक इंदापूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी पार पडली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यामध्ये निवडणूक चुरशीची झाली. वास्तविक इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस हे दोन्ही पक्ष प्रमुख पक्ष असल्याने इंदापूर तालुक्यातुन खासदार सुप्रिया सुळे यांना १ लाख पेक्षा जास्त मताधिक्य मिळणे गरजेचे आहे.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांची माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचीशी चर्चा झाली. पाटील यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न पवार कुटुंबाने केला. तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे आघाडीची उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाल्याची चर्चा तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी सुरु झाल्याने   आमदार भरणे( मामांचे)  खंदे  समर्थक व कार्यकर्ते नाराज झाल्याच्या चर्चेला  उधाण आले होते. भरणेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये कमळाला साथ देवून घड्याळाची टिकटिक कमी करण्यासाठी कमळ फुलवले असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. याचा याचा फटका ही इंदापूर तालुक्यातून बसण्याची दाट शक्यता असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.

यासंदर्भात आमदार भरणे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले की तालुक्यातील  राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षाचा आदेशाची काटेकोरपणे अमंलबजावणी करीत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून जास्तीजास्त मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक व्यक्तीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणे काम केले असल्याचे सांगून खासदार सुप्रिया सुळे यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळणार आहेत. विरोधक केवळ चर्चा करीत असून त्यांच्या चर्चाकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com