भानुदास कोतकरांना कोठडी; सुवर्णा कोतकरांबद्दल काय सांगणार? 

भानुदास कोतकरांना कोठडी; सुवर्णा कोतकरांबद्दल काय सांगणार? 

नगर : केडगाव हत्याकांड प्रकरणी पुणे येथून अटक केलेल्या भानुदास कोतकर याला आज न्यायालयात उभे केले असताना 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर पोलिसांनी हत्या करणारे व या कटात सहभागी असणाऱ्या नऊ जणांना अटक केली आहे. हत्या घडण्यापूर्वी नगरसेवक विशाल कोतकर याने हत्याकांडाचा कट रचल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. त्याने सुवर्णा कोतकर व भानुदास कोतकर यांच्याशीही संभाषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे कोतकरला अटक करणे आवश्‍यक होते. भानुदास कोतकर मात्र पोलिसांना गुंगारा देत होता. काल त्याला येरवडा पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आला असताना अटक करण्यात आली. त्यानुसार आज न्यायालयात उभे केले असता 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, प्रकृती अस्वस्थामुळे कोतकर याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

भानुदास कोतकर हा लॉटरीविक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आजारावर उपचार करण्यासाठी बाहेर आला होता. परंतु जवळच्या पोलिस ठाण्यात रोज हजेरी लावण्याचे आदेश होते. दरम्यान, केडगाव हत्याकांडात नगरसेविका असलेल्या सूनबाई सुवर्णा कोतकर यांचा फोन झाल्याने कोतकर पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आता पोलिस कोठडीत यासंबंधाने पोलिस चौकशी करणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com