भानुदास कोतकरला पुण्यात अटक : हजेरी देण्यास गेला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी भानुदास एकनाथ कोतकर याला पोलिसांनी आज पुण्यात अटक केली. अशोक लांडे खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोत असताना कोतकर उपचारासाठी जामीनावर बाहेर होता. तसेच त्याला जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने आज सकाळी तो येरवडा पोलिस ठाण्यात आला असता पोलिसांनी केडगाव हत्याकांड प्रकरणात अटक केली.
भानुदास कोतकरला पुण्यात अटक : हजेरी देण्यास गेला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी भानुदास एकनाथ कोतकर याला पोलिसांनी आज पुण्यात अटक केली. अशोक लांडे खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोत असताना कोतकर उपचारासाठी जामीनावर बाहेर होता. तसेच त्याला जवळच्या पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे न्यायालयाचे आदेश असल्याने आज सकाळी तो येरवडा पोलिस ठाण्यात आला असता पोलिसांनी केडगाव हत्याकांड प्रकरणात अटक केली.

केडगाव येथे सात एप्रिल रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली. या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह नऊ जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये भानुदास कोतकर याचा पुतण्या नगरसेवक विशाल कोतकर याचाही समावेश आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणात कटाची सुत्रे हलविल्याचा आरोप भानुदास कोतकर याच्यावर आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी भानुदास कोतकर आणि नगरसेविका सुवर्णा कोतकर यांचे एकमेकांना फोन कॉल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते.

कोतकर विरोधात न्यायालयाने स्टॅन्डिंग वॉरंट काढले होते. मात्र पोलिसांना गुंगारा देऊन तो पुणे, मुंबईला राहत होता. दरम्यान, केडगाव येथे मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले असून, भानुदास कोतकर व सुवर्णा कोतकर यांच्या अटकेच्या मागणीवर ते ठाम आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com