भंडारा-गोंदिया : विधानसभेसाठी प्रामुख्याने कुणबी समाजाचा विचार होणार

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रांतील सहा विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी व भारतीय जनता पक्षाने बहुसंख्य कुणबी समाजाचे उमेदवार दिले होते. त्यामुळे या मतदारसंघातील कोणत्याही राजकीय समीकरणासाठी कुणबी समाजाचा विचार होईल, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
भंडारा-गोंदिया : विधानसभेसाठी प्रामुख्याने कुणबी समाजाचा विचार होणार

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रांतील सहा विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी व भारतीय जनता पक्षाने बहुसंख्य कुणबी समाजाचे उमेदवार दिले होते. त्यामुळे या मतदारसंघातील कोणत्याही राजकीय समीकरणासाठी कुणबी समाजाचा विचार होईल, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 
तुमसर विधानसभा क्षेत्रात पोवार समाजही लक्षणीय संख्येत आहे. भाजपचे या समाजातील नेते राजेंद्र पटले यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविली. यातून पोवार समाजाला गृहीत धरून चालणार नाही, ही बाब समोर आली आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यासमोर कॉंग्रेसचे प्रमोद तितीरमारे, राकॉंचे माजी आमदार अनिल बावनकर आणि राजू कारेमोरे यांच्या स्वरूपात आव्हान उभे राहू शकते. 

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील भाजपचे विद्यमान आमदार ऍड. रामचंद्र अवसरे निवडणूक लढविण्यास तयार आहेत. परंतु, पक्षनेत्यांचाच त्यांच्यावर अकार्यक्षम असल्याचा ठपका आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, नगरपरिषद उपाध्यक्ष आशू गोंडाणे, अविनाश साखरे यांची संभावना आहे. युतीच्या काळात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. यावेळीही शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून प्रेमसागर गणवीर, युवराज वासनिक यांची शक्‍याता आहे. 

साकोली विधानसभा क्षेत्रातील भाजपचे विद्यमान आमदार राजेश (बाळा) काशीवार यांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. परंतु, त्यांच्यासमोर यावेळी कुणबी समाजाकडून आव्हान दिले जाईल. कॉंग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील फुंडे यांच्यासोबत लढत होऊ शकते. त्याचबरोबर माजी खासदार नाना पटोले या मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. या मतदारसंघात बहुजन समाज पक्ष, वंचित आघाडीचे उमेदवारांमुळे मतविभाजन होईल. त्यामुळे साकोली विधानसभा क्षेत्रात जोरदार स्पर्धा होण्याची शक्‍यजता आहे. 

गोंदिया विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल किंवा प्रफुल्ल अग्रवाल यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते. भाजपकडून माजी आमदार रमेश कुथे व माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची उमेदवारी आहे. 

तिरोडा विधानसभा क्षेत्रातून भाजपची उमेदवारी विद्यमान आमदार विजय रहांगडाले किंवा गुड्डू बोपचे हे शर्यतीत आहे. डॉ. खुशाल बोपचे यांनाही टाळता येत नाही. राकॉंकडून राजलक्ष्मी तुरकर, दिलीप बन्सोड, अजय गौर यांची शक्‍यता आहे. अर्जुनी मोरगाव क्षेत्रातून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारीची शक्‍यता आहे. त्यांच्याविरोधात राकॉंचे मनोहर चंद्रिकापुरे, कॉंग्रेसचे राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले यापैकी कुणाचीतरी वर्णी लागेल. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठे उलटफेर झाले नसले तरी, संभाव्य उमेदवारांकडून आपले स्थान निश्‍चितीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. 

दखल घेणार कोण? 
लोकसभा निवडणुकीपूर्वी अड्याळ तालुका निर्मिती कृती समिती आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. शेवटी गावकऱ्यांनी मतदान केले. नवीन तालुका निर्मितीसाठी 30 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कोणत्याही सरकारकडून त्याला नकार मिळाला नाही. यावरून मतदारांच्या समस्या, मागण्यांची राजकीय मंडळी किती दखल घेतात, हेच सिद्ध होते. 

महत्वाचे मुद्दे 
- मुंडीपार येथे भेल प्रकल्पाचे सहा वर्षापूर्वी भूमिपूजन. परंतु, प्रकल्प थंडबस्त्यात. 
- तिरोडा परिसरात अदानी वीजनिर्मिती प्रकल्पामुळे प्रदूषणाचा विळखा. 
- रेल्वे रॅक पॉइंट नसल्याने रासायनिक खतांचा पुरवठा नाही. 
- वैनगंगा नदीच्या पात्रातील दूषित पाण्याचा ग्रामीण व शहरी भागात पुरवठा. 
- राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण दोन ठिकाणी रखडले आहे. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com