bhalke supporters gets nervous | Sarkarnama

आमदारकीची हॅट्ट्रीक करणाऱ्या भालकेंना मंत्रिपदाची हुलकावणी

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

प्रदीर्घ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आ.भारत भालके यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

मंगळवेढा - प्रदीर्घ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आ.भारत भालके यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारावर अधिक प्रेम करणाऱ्या या मतदारसंघात `पवार बोले आणि मतदारसंघ हाले' अशी अवस्था या मतदारसंघाची होती. 2009 च्या निवडणूकीत मतदारसंघाला तडा गेल्या त्यानंतर यात गेलेल्या तडा सावरण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही. मात्र 2009 नंतर 2019 या तब्बल दहा वर्षांनी या पक्षाला पुन्हा आ. भालकेच्या रूपाने आमदार मिळाला. भालके यांनादेखील हॅट्रीक करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ढासळलेल्या राष्ट्रवादीला सावरण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या 3 आमदारांमध्ये आ. भालके यांचे नाव अग्रक्रमाने होते. त्यांना मंत्रीपद द्यावे म्हणून मंगळवेढ्यातील एक शिष्टमंडळ पवारांच्या भेटीत जाऊन आले. 

बहुचर्चित तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने व सत्तेत नसल्याचे परिणाम मंगळवेढा-पंढरपूर या तालुक्याला भोगावे लागले आहे. प्रतिस्पर्ध्यावर कोणते डावपेच टाकायचे यात भालके तरबेज असून विरोधकांकडून केलेल्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास माहीर असल्यामुळेच त्याचा मंत्रिमंडळात यांचा समावेश होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु आज झालेल्या मंत्रिमंडळ त्यांना स्थान मिळाल्याबद्दल नाराजीचा सूर निघू लागला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख