भालके, म्हेत्रे आणि शिंदेचा भाजप प्रवेशाचा घोळ संपेना

.
mhetre-shinde-bhalke
mhetre-shinde-bhalke

सोलापूर : आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकीय गणित अडकले आहे.

या तिघांनी सोडचिठ्ठी दिली तर काय, या प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे असल्याचे दिसत नाही. मात्र या तीन नेत्याचा युतीच्या लाटेपुढे दोन्ही कॉंग्रेसची आघाडी हतबल झाली आहे.

शिवसेना आणि भाजप जिल्ह्यात वातावरण निर्मिती करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी मात्र शांत दिसत आहे. 

आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार बबनदादा शिंदे या तिघांना अद्याप भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाले नसल्याचे वृत्त आहे. 

त्यामुळे सोलापूर येथे झालेल्या भाजपच्या मेगाभरतीत राणा जगजितसिंग , जयकुमार गोरे असे बाहेरचेच पुढारी  भाजपवासी झालेले दिसले होते .  आता अकरा तारखेला होंणाऱ्या भाजपच्या अंतिम भरतीत या तिघांपैकी कोणाचा नंबर लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे .

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर हे पाच मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला येतात. मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस हे पाच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतात.

मित्रपक्ष म्हणून सांगोल्याची जागा ही शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात येते. आमदार गणपतराव देशमुख यांनी 2019 ची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला आहे. 

आमदार देशमुख नसतील तर कोण? या प्रश्‍नावर शेकापमधील चंद्रकांत देशमुख यांच्यासह काही जणांची नावे समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आगामी निवडणूक लढविण्याच्या तयारीने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी केली आहे. शेकाप यासाठी सहजासहजी तयार होण्याची शक्‍यता कमी असल्याने माजी आमदार साळुंखे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिलीप सोपल व रश्‍मी बागल यांच्या प्रवेशामुळे बार्शी व करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आमदार शिंदे यांचा भाजप प्रवेश झाल्यास या तालुक्‍यातील राजकीय गणिते आयत्या वेळी बदलण्याची दाट शक्‍यता आहे.

आघाडीचा मित्रपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीपासून सोबत आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही दक्षिण सोलापूर व पंढरपूरच्या जागेवर दावा करण्यास सुरवात केली आहे.

भाजप व शिवसेनेतील इनकमिंग थांबल्यानंतर आणि त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com