भालकेंच्या उद्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा; पण ते तर म्हणतात मला निरोप नाही....

भालकेंच्या उद्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा; पण ते तर म्हणतात मला निरोप नाही....

मंगळवेढा : पंढरपूर मतदारसंघातील काॅंग्रेस आमदार भारत भालके नक्की कोणत्या पक्षात प्रवेश कऱणार, याची आठवडाभर चर्चा सुरू असताना ते सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र स्वतः भालके यांच्याशी  संपर्क साधला असता आपल्याला पक्ष प्रवेशाबाबत निरोप नसल्याचे स्पष्ट केले. आपण सध्या वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून आ. भारत भालके काॅंग्रेस पक्ष सोडणार असलेल्या शक्यतेने जोर धरला. परंतु याबाबत अधिकृत निर्णय होत नसल्यामुळे या मतदारसंघात सस्पेन्स कायम राहिला होता. आमदार भालके यांनी गत  विधानसभा निवडणूकीपुर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लावावी या अटीवर त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमधून आमदार झाले. पण या पाच वर्षात या योजनेची प्रगती झाली नाही.

साखर कारखानदारीला अडचणी लक्षात घेता त्यांना सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून या प्रश्न न्याय मिळू शकेल या आशेने भाजपा जाण्याची मानसीकता करावी अशी इच्छा समर्थकांनी  मांडली. यासाठी मंगळवेढ्यात मेळाव्यात मी घेत असलेल्या निर्णयास आपले समर्थन आहे का असा हात वर करून जनतेला विचारून कौल घेतला. पंढरपूर विधानसभेची जागा युतीत कोणत्या पक्षाला हा घोळ अजून संपुष्टात आला नाही. त्यामुळे भालके यांचा निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.

भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले प्रशांत परिचारक यांचे चुलते सुधाकर परिचारक यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह समर्थकांनी धरला आहे. त्यावेळी परिचारकांनी पक्षाकडे उमेदवारी मागू. विचार नाही केल्यास नंतर बघू, असा शब्द  दिल्यामुळे या मतदारसंघातील भविष्यातील राजकीय घडामोडी निर्णायक  वळणावर येऊन ठेपल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com