भय्याजी जोशी यांनी केंद्राचे कान उपटले

सध्या दिल्ली अशांत आहे. तेथील नागरिक अशांततेच्या वातावरणातून जात आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्लीत शांतता, कायदा व सुव्यवस्था स्थापन करावी, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी येथे एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना केले.
bhaiyaji joshi criticises centre over delhi situation
bhaiyaji joshi criticises centre over delhi situation

नागपूर ः सध्या दिल्ली अशांत आहे. तेथील नागरिक अशांततेच्या वातावरणातून जात आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्लीत शांतता, कायदा व सुव्यवस्था स्थापन करावी, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी येथे एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना केले.

दिल्ली सध्या अशांत असून दिल्लीतील राज्य शासन आणि दिल्लीस्थित केंद्र शासन एकमेकांकडे बोटे दाखवण्यात आनंद मानत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार्यवाह जोशींचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. 

ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त परिस्थिती चार दिवस होऊनही पोलिसांना आटोक्‍यात आणता आलेली नाही. दिल्लीत 1984 ची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, असे सांगतानाच प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. 

या पार्श्वभूमीवर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केंद्र सरकारचे कान उपटले आहे. कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी पावले उचलावीत आणि आवश्‍यक तिथे कठोर कारवाई करावी, असे भय्याजी जोशी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com