पंकजा ताईंच्या ट्‌विटचा चुकीचा अर्थ काढला, त्या भाजपमध्येच राहतील - डॉ. भागवत कराड

पंकजा ताईंच्या ट्‌विटचा चुकीचा अर्थ काढला, त्या भाजपमध्येच राहतील - डॉ. भागवत कराड

औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती असल्यामुळे परळीतील कार्यकर्ते आणि समर्थकांना गोपीनाथ गडावर येण्याचे आवाहन करण्यासाठी पंकजा ताईंनी ट्विट केले होते. त्याचा चुकीचा अर्थ काढून त्या भाजप सोडणार, शिवसेनेत जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहतील असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

पंकजा मुंडे यांच्या ट्‌विटवरून राज्यभरात त्या भाजप सोडणार आणि शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांचे कट्टर समर्थक आणि विश्‍वासू म्हणून ओळखले जाणारे डॉ. भागवत कराड यांच्या संपर्क साधला असता त्यांनी या सगळ्या शक्‍यता फेटाळून लावल्या. डॉ. कराड म्हणाले, सोशल मिडियावर सुरू असलेला हा सगळा खोडसाळपणा आहे. पंकजा मुंडे यांनी केलेले ट्‌विट हे परळीतील त्यांच्या समर्थकांसाठी होते. गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती असल्यामुळे गोपीनाथ गडावरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठीचे ते ट्‌विट होते. परंतु परळी मतदारसंघातील पराभवानंतर त्या पहिल्यांदाच जाहीरपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. त्यातूनच पंकजा मुंडे भाजप सोडणार अशा वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. 

संजय राऊतांकडून दिशाभूल 
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्यासह बडे नेते आमच्या संपर्कात असल्याच्या विधानावर देखील कराड यांनी टिका केली. संजय राऊत हे दिशाभूल करण्यासाठी असे विधान करत आहेत. प्रसारमाध्यम व सोशल मिडियावरील चर्चेचा गैरफायदा घेत राऊतांकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. त्या पक्ष सोडणार यात तसुभरही तथ्य नाही. पंकजा मुंडे या भाजमध्येच राहतील याचा पुनरूच्चारही कराड यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com