पाटोदाहून आलेल्या मतदारांना राष्ट्रवादी उमेदवाराने बीडमध्ये रोखले (व्हिडीओ )

आम्ही जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेच्या महाविद्यालयातील कर्मचारी असल्याने मतदारांना घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगीतले. तर, आपल्या महाविद्यालयातील कर्मचारी नसल्याचे शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
पाटोदाहून आलेल्या मतदारांना राष्ट्रवादी उमेदवाराने बीडमध्ये रोखले (व्हिडीओ )

बीड  : दुसऱ्या मतदार संघातील रहिवाशी असल्याने तुम्ही बोगस मतदार आहात, असा आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी २० मतदारांना मतदानापासून रोखले.

या मतदारांना घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांनी आम्ही शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेचे कर्मचारी असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यासमोर सांगीतले. परंतु, हा आरोप फेटाळत हे कर्मचारी आपल्या संस्थेचे नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

सोमवारी साधारण ११ वाजेच्या सुमारास एक महिला व एक पुरुष २० मतदारांना घेऊन शहरातील एका मतदान केंद्रात गेले. हे सर्व मतदार पाटोदा (आष्टी मतदार संघ) येथील असल्याने त्यांचे मतदान बोगस असल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी त्यांना मतदानापासून रोखले. 

या दोघांनी आपण जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेचे महाविद्यालयाचे कर्मचारी असल्याचे सांगीतले. मात्र, याच्याशी काही संबंध नसल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. यामुळे काही काळ किरकोळ तणाव निर्माण झाला. नंतर सुरळीत मतदान पार पडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com