बीडमध्ये हक्काचा मल्ल म्हणून मुंडेंकडून मस्केंना बळ

पंकजा मुंडे यांच्याकडून बीड मतदार संघात राजेंद्र मस्के यांना बळ दिले जात आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्याकडून आग्रह धरला जाऊ शकतो.
Munde-&-Maske
Munde-&-Maske

बीड : पुर्वी  जयदत्त क्षीरसागरांसोबत समझोत्याचे राजकारण असल्याने पाच वर्षांत बीड मतदार संघात भाजप वाढविण्याची गरजच वाटली नाही. मात्र, काळासोबत समिकरणे बदलत असल्याने पंकजा मुंडेंनाही बीडमध्ये विधानसभा निवडणुक लढवू शकणारा हक्काचा उमेदवार गरजेचा वाटू लागला आहे. त्यामुळेच राजेंद्र मस्के यांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. 

विधानसभेला शिवसेनेशी युती झाली नाही तर आपल्या हातात प्रबळ उमेदवार असावा यासाठीही राजेंद्र मस्के यांची प्रतिमा निर्मिती केली जात आहे असे दिसते . 

युतीत सहा पैकी केवळ बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे बीडमध्ये पक्षाची फार काही ताकद असावी अशी गरजच वाटली नाही. त्यातच बीड मतदार संघात राजकारण करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्याशीही भाजप नेत्यांचे समझोत्याचेच राजकारण होते. त्यामुळे बीड मतदार संघातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना भाजप नेत्यांच्या पाठबळा इतकी क्षीरसागरांची ‘कृपा’ असे. परंतु, क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश आणि मंत्रीपद यामुळे समिकरणे बदलू पाहत आहेत. 

आता विकास कामांच्या श्रेयाचे वाटेकरी झालेले जयदत्त क्षीरसागर राजकीयदृष्ट्याही पंकजा मुंडेंच्या बरोबरीत येण्याची शक्यता  भाजपलाच वाटू लागली आहे. त्यामुळे आता इथेही विधानसभ निवडणुक ताकदीने लढवू शकेल असा हक्काचा मल्ल असावा अशी गरज भाजपला वाटली. योगायोगाने स्वतंत्र यंत्रणा, कार्यकर्त्यांचा संच असलेले राजेंद्र मस्के यांचा भाजपा प्रवेश झालेलाच होता.

त्यामुळे राजेंद्र मस्के यांना पंकजा मुंडे यांच्याकडून राजकीय बळ दिले जात आहे. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे नियोजन आणि त्या निमित्ताने त्यांनी दुचाकी फेरीच्या माध्यमातून केलेले शक्तीप्रदर्शन असो वा वारंवार पंकजा मुंडे यांच्या राजेंद्र मस्के यांच्या घरी दिलेल्या भेटी याचाच भाग मानल्या जातात. कदाचित शिवसेनेबराबर युती झाली नाही तर पंकजा मुंडे यांच्याकडून मस्के यांच्या नावासाठी जोर लावला जाऊ शकतो.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com